दिवेआगार येथे उभारणार सुपारी संशोधन केंद्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2023 07:17 IST2023-11-08T07:15:50+5:302023-11-08T07:17:15+5:30

रायगड जिल्ह्यात सुपारीचे बागायती पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते.

Betel nut research center to be set up at Diveagaar | दिवेआगार येथे उभारणार सुपारी संशोधन केंद्र

दिवेआगार येथे उभारणार सुपारी संशोधन केंद्र

मुंबई : रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगार येथे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोलीअंतर्गत सुपारी संशोधन केंद्र उभारण्यास कृषी विभागाने मान्यता दिली आहे. यासाठी ५ कोटी ६४ लाख रुपये निधी खर्चासही मान्यता देण्यात आली आहे. 

कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली व रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या उपस्थितीत यासंदर्भात अलीकडेच बैठक पार पडली होती, त्यात हा निर्णय घेतला होता. रायगड जिल्ह्यात सुपारीचे बागायती पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. त्याला आधुनिक तंत्रज्ञानाची साथ मिळावी यादृष्टीने सुपारी संशोधन केंद्र उभारले जावे यासाठी खासदार सुनील तटकरे, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे तसेच आमदार अनिकेत तटकरे हे आग्रही होते.

या सुपारी संशोधन केंद्राच्या माध्यमातून सुपारीच्या बुटक्या तसेच अधिक दर्जेदार व अधिकचे उत्पन्न देणाऱ्या जाती विकसित करणे, दिवे आगार व परिसरातील हवामानाचा विचार करून आंतरपिके घेण्याचे तंत्रज्ञान विकसित करणे, विकसित तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यक्रमांचे आयोजन, रोजगार निर्मिती, रोपवाटिका उभारणे, कलमे विकसित करणे, परिसरातील गावांचा ग्रामविकास आराखडा तयार करणे असे अनेक उपक्रम राबविण्यात येतील.

Web Title: Betel nut research center to be set up at Diveagaar

टॅग्स :Raigadरायगड