शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Karnataka Election 2018 : निवडणूक कर्नाटकात, पैज कोल्हापुरात; अनोख्या पैजेची सर्वत्र चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2018 13:28 IST

51 हजार रुपयांच्या अनोखी पैज सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरते आहे

माणगाव (कोल्हापूर) : कर्नाटक येथे झालेल्या विधानसभा निवडणुकीत कोणता पक्ष बाजी मारणार, याबद्दल राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र हातकणंगले तालुक्यातील माणगावमध्ये उपसरपंच राजू मगदूम आणि सामाजिक कार्यकर्ते नेमगोंडा मगदूम यांनी या निवडणुकीच्या निकालावर 51 हजार रुपयांची पैज लावली आहे. या पैजेची सध्या माणगावात मोठी चर्चा आहे. विशेष म्हणजे, पैज जिंकलेली व्यक्ती संपूर्ण रक्कम  वैष्णवी देवी मंदिराच्या विकासासाठी देणार आहे. कर्नाटकमधील निवडणुकीत काँग्रेस पक्ष बाजी मारणार, असं उपसरपंच राजू मगदूम यांना वाटतं. तर सामाजिक कार्यकर्ते पदमावती पाणी पुरवठा संस्थेचे माजी चेअरमन नेमगोंडा मगदूम यांना भाजपा विजयी होईल, याबद्दल ठाम विश्वास आहे. त्यामुळेच या दोघांनी 51 हजार रुपयांची पैज लावली असून त्याबद्दल लेखी मसुदादेखील तयार केला आहे. विशेष म्हणजे, जो कोणी ही पैज जिंकेल, त्यानं ती रक्कम वैष्णवी देवी मंदिराच्या विकासासाठी द्यायची, असा करार आहे. या करारावर सात साक्षीदारांच्या स्वाक्षऱ्यादेखील आहेत. कर्नाटकमध्ये सरकार कोणाचंही आलं किंवा पैज कोणीही जिंकलं, तरी फायदा मंदिराचा होणार असल्यानं या पैजेची चर्चा सध्या संपूर्ण माणगावात आहे.  

टॅग्स :Karnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८kolhapurकोल्हापूरBJPभाजपाcongressकाँग्रेस