‘बेलोन डियोर’ पुरस्कार आणि दंतकथा

By Admin | Updated: June 2, 2014 23:52 IST2014-06-02T23:52:55+5:302014-06-02T23:52:55+5:30

पोतरुगालचा स्टार खेळाडू ािस्टियानो रोनाल्डोला 2क्13 मधील चमकदार कामगिरीसाठी गेल्या वर्षी ‘बेलोन डियोर’ पुरस्काराने गौरविण्यात आले.

'Belon Dior' award and legend | ‘बेलोन डियोर’ पुरस्कार आणि दंतकथा

‘बेलोन डियोर’ पुरस्कार आणि दंतकथा

>पॅरिस : पोतरुगालचा स्टार खेळाडू ािस्टियानो रोनाल्डोला 2क्13 मधील चमकदार कामगिरीसाठी गेल्या वर्षी ‘बेलोन डियोर’ पुरस्काराने गौरविण्यात आले. हा रोनाल्डोसाठी आनंद साजरा करण्याचा क्षण होता, पण या पुरस्कारासोबत जुळलेल्या दंतकथांमुळे त्याच्या देशातील चाहत्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली.
पोतरुगाल संघ विश्वकप स्पर्धेत अंडर डॉग्ज म्हणून प्रारंभ करणार असला, तरी त्यांची भिस्त चाणाक्ष कर्णधार रोनाल्डोच्या कामगिरीवर अवलंबून आहे. देशातील चाहत्यांना रोनाल्डोकडून सवरेत्तम कामगिरी अपेक्षित आहे.  
फ्रान्सच्या फुटबॉल नियतकालिकाने 1956 मध्ये युरोपातील खेळाडूंच्या कामगिरीची दखल घेण्यासाठी बेलोन डियोर पुरस्काराचा प्रारंभ केला. त्यानंतर या पुरस्काराने प्रत्येक वर्षी जगातील सवरेत्तम फुटबॉलपटूला गौरविण्यात येऊ लागले, पण आजतागायत यापूर्वी ज्या 14 खेळाडूंना या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने गौरविण्यात आले त्यांना विश्वकप स्पर्धेत लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही.  
1995 च्या पूर्वी केवळ युरोपियन खेळाडू या पुरस्कारासाठी पात्र होते. त्यात तीन वेळा विश्वविजेतेपदाचा मान मिळविणा:या ब्राझीलचा पेले आणि 1986 मध्ये अज्रेन्टिनाच्या विजेतेपदाचा नायर डिएगो मॅराडोना यांच्यासारखे खेळाडू या पुरस्काराच्या शर्यतीत नव्हते. तरी अनेक दिग्गज खेळाडू या पुरस्काराबाबत जुळलेल्या दंतकथेचा भाग झाले. 
सलग चार बेलोन डियर पुरस्काराचा मानकरी ठरलेला बार्सिलोनाचा स्टार लियोनल मेस्सीने 2क्क्9 मध्ये प्रथम हा पुरस्कार पटकाविला. 2क्1क् मध्ये दक्षिण आफ्रिकेत खेळल्या गेलेल्या विश्वकप स्पर्धेत मेस्सीचा संघ उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरला, पण मेस्सीला एकही गोल नोंदविता आला नाही. त्यानंतर जर्मनीने या संघाचा 4-क् ने पराभव करीत त्यांना बाहेरचा मार्ग दाखविला. 
1957 मध्ये बेलोन डियोर विजेता व रियाल माद्रिदचा दिग्गज एल्फ्रेड डी स्टेफानोपासून या दंतकथेला प्रारंभ झाला. अज्रेन्टिनामध्ये जन्मलेला डी स्टेफानोने 1958 च्या पात्रता स्पर्धेदरम्यान स्पेनचे नागरिकत्व मिळविले होते. अज्रेन्टिना व कोलंबियाचे प्रतिनिधित्व करण्याचा अनुभव असलेल्या डी स्टेफानोच्या उपस्थितीत स्पेन संघाला अंतिम फेरीसाठी पात्रता गाठता आली नाही आणि जगातील सर्वात महान खेळाडूंमध्ये समावेश असलेल्या या दिग्गज खेळाडूला पुन्हा एकदा विश्वकप स्पर्धेत सहभागी होता आले नाही. 
गत बेलोन डियोर विजेत्या खेळाडूंचा समावेश असलेल्या पाच संघांना विश्वकप स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळाली, पण त्यांच्या संघांना जेतेपदाला गवसणी घालता आलेली नाही.
इटलीच्या रोबटरे बाजियोसाठी अमेरिकेत 1994 मध्ये खेळल्या गेलेली विश्वकप स्पर्धा निराशाजनक ठरली. 1993 मध्ये बेलोन डियोर पुरस्काराचा मानकरी ठरेलल्या बाजियोने सर्व पाच गोल बाद फेरीमध्ये नोंदविले. अंतिम लढतीमध्ये 12क् मिनिटे उभय संघांना गोल नोंदविता आला नाही. निकालाची कोंडी फोडण्यासाठी पेनल्टी शूटचा आधार घेण्यात आला. त्यात बाजियोने मारलेला फटका गोलपोस्टच्या वरून गेला आणि ब्राझीलने चौथ्यांदा विश्वविजेतेपदाचा मान मिळविला. (वृत्तसंस्था)

Web Title: 'Belon Dior' award and legend

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.