शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
4
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
5
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
6
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
7
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
8
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
9
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
10
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
11
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
12
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
13
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
14
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
15
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
16
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
17
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
18
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
19
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
20
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी

मुख्यमंत्र्यांशी संवादानंतर बच्चू कडूंचे आंदोलन मागे, पालकमंत्र्यांची शिष्टाई

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2017 8:21 PM

प्रहारचे सर्वेसर्वा आ. बच्चू कडू यांनी विविध मागण्यांसाठी पुकारलेले अन्नत्याग आंदोलन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणीनंतर तब्बल चार दिवसांनी सोमवारी मागे घेतले.

अमरावती : प्रहारचे सर्वेसर्वा आ. बच्चू कडू यांनी विविध मागण्यांसाठी पुकारलेले अन्नत्याग आंदोलन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणीनंतर तब्बल चार दिवसांनी सोमवारी मागे घेतले. त्याकरिता पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी यशस्वी शिष्टाई केली असून आंदोलनाची दखल घेत शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला, हे विशेष.

स्थानिक गाडगेनगरातील संत गाडगेबाबा समाधी मंदिरासमोरील प्रांगणात दिव्यांग, अनाथ, विधवा, परितक्त्या, शेतकरी, शेतमजूर व बेघरांच्या न्याय्य हक्कासाठी प्रहार संघटनेच्यावतीने १३ आॅक्टोबरपासून अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात आले. आ.बच्चू कडू हे स्वत: आंदोलनात सहभागी होते. आंदोलनस्थळी मुलांबाळांसह पालाच्या झोपडीत राहुट्या टाकून आंदोलनात नागरिक सहभागी झाले होते. दरम्यान पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या पुढाकाराने रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आ. कडूंच्या मागण्यांसंदर्भात बैठक घेतली. या बैठकीत जिल्हास्तरीय प्रश्न, समस्या मार्गी लावल्याचे आ.कडू यांना प्रशासनाने कळविले. मात्र, राज्यपातळीवर समस्या, प्रश्न मार्गी लागल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका आ.कडू यांनी घेतली. सोमवारपासून मौनव्रत आंदोलनास प्रारंभ होईल, असे पत्रपरिषदेत जाहीर केले. किंबहुना रविवारी रात्री १० वाजतादरम्यान आ. कडू यांची प्रकृती खालावल्याने त्यांना तातडीने इर्विनच्या अतीदक्षता कक्षात  भरती करण्यात आले. यावेळी त्यांच्या पत्नी नैना कडूसुद्धा होत्या. त्यानंतर पालकमंत्री पोटे यांनी इर्विनचे शल्य चिकित्सक श्यामसुंदर निकम यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून आ.कडू यांच्या प्रकृतीबाबत काळजी घेण्याची सूचना केली.

कालांतराने ना.पोटे हे आ.बच्चू कडू यांची भेट घेण्यास ईर्विनमध्ये पोहचले. दरम्यान ना.पोेटेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधला आणि आंदोलनाची माहिती दिली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार आ.बच्चू कडू यांच्या राज्यस्तरीय मागण्यांबाबत २४, २५ आॅक्टोबर अथवा त्यांच्या सोईनुसार मुंबईत बैठक घेऊन प्रश्न, समस्या सोडविल्या जातील, असे  पालकमंत्र्यांच्या स्वाक्षरीचे पत्र आ. कडूंना देण्यात आले. एवढेच नव्हे, तर पालकमंत्र्यांनी भ्रमणध्वनीद्वारे मुख्यमंत्र्यांशी आ.कडू यांचा संवाद करून दिला. आ.कडू हे मुख्यमंत्र्यासोबत बोलले आणि त्यांनी दिलेला शब्द अधोरेखित मानून सोमवारी मध्यरात्री अन्नत्याग आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला.

जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक-दिव्यांग, विधवा, परितक्त्या तसेच पालघरांमधील नागरिक आदी विविध घटकांसाठीच्या कल्याणकारी योजनांची अपूर्ण कार्यवाही एका महिन्यात पूर्ण करावी, तसेच, दिव्यांगांसाठीचा तीन टक्के निधी खर्च न करणाºया संबंधित अधिकाºयांवर जबाबदारी निश्चित करावी, असे निर्देश पालकमंत्री प्रवीण पोट यांनी रविवारी येथे दिले. दिव्यांग व विविध घटकांच्या प्रश्नांसाठी आ. बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आ.कडू व पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत जिल्हा प्रशासनाची महत्त्वपूर्ण बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. त्यावेळी पोटे बोलत होते. जिल्हाधिकारी अभिजित बांगर, महापालिका आयुक्त हेमंतकुमार पवार, ग्रामीण विकास यंत्रणेचे के.एम. अहमद यांच्यासह उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी आदी उपस्थित होते.

आ.कडूंच्या आंदोलनाबाबत शनिवारी पत्र मिळाले. त्यानुसार विविध यंत्रणांची रविवारी बैठक  घेऊन स्थानिक प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना केल्यात. राज्यस्तरीय प्रश्न, समस्यांबाबत २४ व २५ आॅक्टोबर रोजी मुख्यमंत्री बैठक घेऊन त्या सोडवतील, असा निर्णय झाला.- प्रवीण पोटे, पालकमंत्री

टॅग्स :Bachhu Kaduबच्चू कडू