शहरं
Join us  
Trending Stories
1
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
2
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
3
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
4
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
5
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
6
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
7
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
8
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
9
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
10
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
11
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
12
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
13
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
14
‘जे. जे.’ नर्सिंग होमला येणार कॉर्पोरेट लूक; खासगी रुग्णालयाप्रमाणे रचना, रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा
15
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
16
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
17
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
18
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
19
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
20
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई

राज्यात धुवाधार 'वर्षा'व करणाऱ्या मॉन्सूनच्या 'एक्झिट' ला सुरुवात; यंदा १७ दिवस अधिक मुक्काम

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2020 7:51 PM

विदर्भातून मॉन्सूनची माघारी ; नांदेड, नाशिक, डहाणुपर्यंत मॉन्सून परतला

ठळक मुद्दे२८ ऑक्टोबरपासून गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता गेल्या काही वर्षांपासून मॉन्सूनचे आगमन व परतीच्या प्रवासात मोठा बदल

पुणे : गेल्या चार महिन्यांपासून अधिक काळ राज्यात धुवांधार वर्षा करणाऱ्या मॉन्सूनने राज्यातून एक्झिट घेण्यास सुरुवात केली आहे़. संपूर्ण विदर्भासह, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र व कोकणच्या काही भागातून मॉन्सून माघारी परतल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे. दक्षिण पश्चिम मॉन्सून नांदेड, नाशिक, डहाणुपर्यंत माघारी आला आहे.

नैऋत्य मॉन्सूनने पश्चिम बंगालचा काही भाग, झारखंडचा बहुतेक भाग, ओडिशाचा काही भाग, छत्तीसगडचा उर्वरित भाग, आंध्र प्रदेशचा किनारपट्टीचा काही भाग, तेलंगणा, संपूर्ण विदर्भ, मध्य प्रदेश, गुजरात आणि अरबी समुद्राचा उत्तरेकडील भागातून परतला आहे़ संपूर्ण देशातून मॉन्सून २८ ऑक्टोबरपर्यंत माघारी परतण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर तामिळनाडु आणि पुडुचेरी, आंध्र प्रदेशचा किनारी भाग,कर्नाटक आणि केरळच्या आसपास २८ ऑक्टोबरपासून ईशान्य मॉन्सूनचा पाऊस सुरु होण्याची शक्यता आहे. 

गेल्या २४ तासात कोकणातील संगमेश्वर, देवरुख, राजापूर, महाड, पोलादपूर, म्हसळा, वैभववाडी, वेंगुर्ला, लांजा, मालवण, मंडणगड, मुरुड आदि भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला़ मध्य महाराष्ट्रातील पाटण, पौड मुळशीसह अनेक ठिकाणी पाऊस पडला होता. विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. 

२७ ऑक्टोबर रोजी कोंकण, गोव्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. २८ ऑक्टोबरपासून गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे़ ़़़़़़़़मॉन्सूनचा मुक्काम लांबला..बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाचे क्षेत्र आंध्र प्रदेश मार्गे मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातून अरबी समुद्रात जाऊन मिळाले होते. त्यामुळे मॉन्सूनचा परतीचा प्रवास लांबला होता.  गेल्या काही वर्षांपासून मॉन्सूनचे आगमन व परतीच्या प्रवासात मोठा बदल आढळून आला आहे. त्यामुळे या वर्षी हवामान विभागाने देशभरातील विविध शहरात मॉन्सूनचे आगमन कधी होणार व तो कधी परतणार याच्या नवीन तारखा जाहीर केल्या आहेत. विदर्भातून ३ ऑक्टोबर, मराठवाडा २८ सप्टेबर रोजी परतेल अशा यापूर्वी तारखा जाहीर केल्या होत्या. त्यात यंदा ८ व ९ ऑक्टोबर अशा सुधारित तारखा जाहीर केल्या होत्या. प्रत्यक्षात मॉन्सूनने आज सोमवारी एक्झिट घेतल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

मॉन्सूनच्या माघारीची सरासरी तारीखस्थळ                     जुनी तारीख    सुधारीत तारीख     प्रत्यक्षात माघारीअकोला                   ३ ऑक्टोबर    ८ ऑक्टोबर        २६ ऑक्टोबरऔरंगाबाद            २८ सप्टेबर      ९ ऑक्टोबर         २६ ऑक्टोबरअहमदनगर          २८ सप्टेबर     ८ ऑक्टोबर         अजून मुक्कामपुणे                      ३० सप्टेबर      ९ ऑक्टोबर         अजून मुक्कामसातारा                ३ ऑक्टोबर     १२ ऑक्टोबर       अजून मुक्कामगोवा                   ३० सप्टेबर      १४ ऑक्टोबर       अजून मुक्काम

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसMonsoon Specialमानसून स्पेशलweatherहवामान