शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

बीडच्या मुंडे दाम्पत्याला सक्तमजुरी

By admin | Updated: June 16, 2015 04:09 IST

गर्भलिंग निदान चाचणीप्रकरणी सोमवारी येथील प्रथमवर्ग न्यायालयाने डॉ. सरस्वती व डॉ. सुदाम मुंडे या दाम्पत्याला चार वर्षांची

चार वर्षांची शिक्षा : गर्भलिंग निदान प्रकरण

परळी (बीड) : गर्भलिंग निदान चाचणीप्रकरणी सोमवारी येथील प्रथमवर्ग न्यायालयाने डॉ. सरस्वती व डॉ. सुदाम मुंडे या दाम्पत्याला चार वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. डॉ. सुदाम मुंडे अन्य एका प्रकरणात सध्या नाशिक कारागृहात शिक्षा भोगत आहे. १९ सप्टेंबर २०१० रोजी लेक लाडकी अभियानच्या अ‍ॅड. वर्षा देशपांडे यांनी मुंडे दाम्पत्याच्या दवाखान्यात प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान चाचणीचे ‘स्टिंग आॅपरेशन’ करून आरोग्य विभागाकडे त्याची तक्रार केली होती. त्यानंतर मुंडे दाम्पत्यास अटक झाली होती. एक दिवसाच्या पोलीस कोठडीनंतर अंबाजोगाई न्यायालयाने त्यांना जामीन दिला होता. शहर पोलिसांनी तपास करून प्रकरण परळी न्यायालयात दाखल केले. सुरुवातीला सरकारी वकील म्हणून अ‍ॅड. अतुल तांदळे यांनी बाजू मांडली. न्या. एल.जी. पाच्छे यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डॉ. कैलास दुधाळ, तत्कालीन उपजिल्हाधिकारी राजेश जोशी, अ‍ॅड. वर्षा देशपांडे, अ‍ॅड. शैला जाधव, गरोदर माता प्रेरणा भिल्लारे, नायब तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांचे जबाब महत्त्वपूर्ण ठरले. आठ कलमांनुसार प्रत्येकी सहा महिने कैद व १० हजार रुपये दंड अशी ४८ महिने कैद व ९० हजार रुपये दंडाची शिक्षा कोर्टाने ठोठावली. विशेष सरकारी अभियोक्ता म्हणून अ‍ॅड. बालाजी आयनिले यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)