मुंबई - धनंजय मुंडे यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. याची जाणीव त्यांना झालीय म्हणून जनता दरबार वैगेरे घेतायेत. परंतु धनंजय मुंडे यांचा गेम ओव्हर झालाय. ज्योत मालवताना खूप फडफडते तसा प्रकार धनंजय मुंडे यांचा झालाय असा घणाघात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली. बीड प्रकरणावर भाष्य करताना अंजली दमानिया यांनी हे विधान केले.
अंजली दमानिया म्हणाल्या की, बीडमध्ये पोलीस प्रशासनाचा वचक नाही. बीडमध्ये अत्यंत गंभीर परिस्थिती आहे. आज गोळीबारात २ भाऊ मृत्यू पडतात. बीडमध्ये मोठ्या प्रमाणात दहशत आहे. कुणीही उठतं आणि अशी कृत्य करते. संविधान आहे आणि सर्व समाज घटकांना न्याय मिळाला पाहिजे परंतु न्याय मिळत नसेल तर शासनाने योग्य निर्णय घ्यायला हवा. प्रत्येक समाजातील घटकाला न्याय मिळाला पाहिजे. शासनाने निर्णय घेण्याची गरज आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच ईडीचे समन्सही वाल्मिकला आले होते. एक एक गाडी दीड कोटीची आहे. वाईन्स शॉप आणि त्यासाठी दुकानाची जागा आहे ती १ कोटी ६९ लाखाची आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात पेमेंट केले जातायेत. रक्कम फिरवली जाते. महागड्या गाड्या कुठून येतात. मंजली कराड यांच्या नावावर प्रॉपर्टी आहेत. सामान्य घरगडी असणाऱ्यांना काही काळाने इतकी संपत्ती कशी जमा झाली, याचीही चौकशी व्हायला हवी. वाल्मिक कराडच्या बायकोने माझं नाव का घेतले, देशमुख कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी माझा लढा आहे. माझे नाव घेताना भान ठेवून बोला असा इशाराही अंजली दमानिया यांनी कराड यांच्या पत्नीला दिला.
दरम्यान, बीडमध्ये जी आंदोलन सुरू आहेत ती कुणासाठी होतायेत, खंडणी, जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीचं समर्थन करतायेत कुणासाठी आपण लढतोय हे लोकांना बघायला हवं. एका घरातील मुलगा गेलाय, निर्घृण हत्या झालीय, सुरेश धस पहिल्या भाषणात विनोदी शैलीत बोलले, खालून टाळ्या, शिट्ट्या वाजत होत्या. या प्रकरणाचं गांभीर्य आहे. सुरेश धस टाईमपाससाठी बोलतायेत वाटलं त्यांनी असं बोलू नये. धस यांना लढायचं असेल गांभीर्याने लढावं असं टाईमपास करू नये असंही अंजली दमानिया यांनी म्हटलं.