बूटचोरीच्या राड्यानंतर 'त्या' मुलीला दोनच दिवसात मिळाला दुसरा साथीदार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2018 10:56 IST2018-05-08T10:56:06+5:302018-05-08T10:56:06+5:30

अवघ्या दोनच दिवसात तिला नवा जोडीदार मिळाला.

beed girl gets new partner after getting divorce post ruckus during wedding | बूटचोरीच्या राड्यानंतर 'त्या' मुलीला दोनच दिवसात मिळाला दुसरा साथीदार

बूटचोरीच्या राड्यानंतर 'त्या' मुलीला दोनच दिवसात मिळाला दुसरा साथीदार

बीड- लग्नात बूटचोरीवरुन झालेल्या राड्यानंतर लग्न मोडलेल्या मुलीला नवा जोडीदार मिळाला आहे. बीडच्या अंबाजोगाईतील तरुणाशी वधूचं लग्न झालं असून निकाह मोडल्यानंतर अवघ्या दोनच दिवसात तिला नवा जोडीदार मिळाला.आंबाजोगाईमधील सायगावमध्ये राहणाऱ्या युवकाशी तरुणीचं लग्न झालं. 

नेमंक प्रकरण काय?
लग्नात मुलीकडच्यांनी नवरदेवाचे बूट लपवून त्याच्याकडून पैसे घ्यायचे ही पद्धत आपल्याकडे आहे. परंतु याच बूट लपवण्यावरुन झालेल्या वादात चक्क नवरदेवाचेच डोके फुटल्याची घटना आहे. बीडच्या केज तालुक्यातील कुंभेफळ गावात रविवारी हा धक्कादायक प्रकार घडला.  महत्त्वाचे म्हणजे सासऱ्याने झालेले लग्न मोडून मुलीला तलाक घ्यायला लावला आहे.

सुलताना युनूस शेखचा नबी सिकंदर शेख यांच्या मुलीशी निकाह होता. पण लग्नाआधी मुलीच्या भावाने नवरदेवाचे बूट लपवल्याने वाद झाला आणि त्याचे रुपांतर मारहाणीत झाले.  मात्र, सामोपचाराने हा वाद मिटला, लग्नही झाले. पण लग्नाआधी घडलेल्या प्रकारावरुन पुन्हा वादाला सुरुवात झाली. या हाणामारीत नवरदेवाचे डोकं फुटले आणि त्याला सहा टाके पडले.  सासऱ्यानेच आपल्या हातातील लाकडाने नवरदेवावर वार केल्याचा आरोप आहे.

सुलतानवर केजच्या सरकारी रुग्णालयात उपचार केल्यावर, नवरदेवाची मंडळी युसूफ वडगाव पोलिस स्टेशनला गेली.  पोलिस स्थानकात बराच काळ तणाव निर्माण झाल्यानंतर पोलीस दाखल झाले. मात्र शेवटी हा वाद तलाक होऊन संपला. 

Web Title: beed girl gets new partner after getting divorce post ruckus during wedding