शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 19:30 IST

Beed-Ahilyanagar railway : "आम्ही समाजाचे भले करायला आलो आहेत. देशाचे पंतप्रधान आमच्या पाठीशी आहेत. केंद्र सरकार आमच्या पाठीशी आहेत...."

गेल्या तब्बल ४० वर्षांपासून रखडलेले बीडकरांचेरेल्वेचे स्वप्न आज अखेर पूर्ण झाले. बीड जिल्ह्यातील रेल्वे स्थानकाचे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. बीड-अहिल्यानगर रेल्वे सेवेला आजपासून प्रारंभ झाला. या कार्यक्रमासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, पंकजा मुंडे आदी नेते उपस्थित होते. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थितांमधील 'अती उत्साहीं'ना चांगलेच झापल्याचे दिसून आले. 'तुम्ही आज असे चेकाळला आहात की, तुमचे नेते उठले की, ह्या.. हू..., काय तुम्ही? कधी रे सुधारणार तुम्ही?' अशा शब्दांत अजित पवार यांनी या चकाळणाऱ्यांचे कान टोचले.

सवयी चांगल्या लावा... -अजित पवार म्हणाले, "आज मुख्यमंत्र्यांनी हिरवा झेंडा दाखवल्यानंतर, आजच्याच दिवशी फक्त मोफत प्रवास करायचा आहे. परत तिकीट काढून प्रवास करायचा. नाही तर म्हणाल, त्या दिवशी आम्हाला फुकट दिलं आणि आता काय पैसे घेताय? आजच्या दिवसापुरताच आहे, कारण आज उद्घाटन आहे. त्यामुळे सवयी चांगल्या लावा. 

"ह्या.. हू..., काय तुम्ही? कधी रे सुधारणार तुम्ही?" -अजित दादा पुढे म्हणाले "मी मघापासून बघतोय... मी महाराष्ट्रात फिरत असतो, वेगवेगळ्या भागांत जात असतो. पण तुम्ही आज असे चेकाळला आहात की, तुमचे नेते उठले की, ह्या.. हू..., काय तुम्ही? कधी रे सुधारणार तुम्ही? परत मग मी बोललो की, दादा आले आणि आम्हाला बोलले. अरे जग कुठे चाललंय? इतर देश कुठे चालले? इतर राज्य कुठे चाललीत? आपण जरा आत्मचिंतन, आत्मपरीक्षण करा. कशामध्ये आपण वाद घालतोय? कशा करता समाजा-समाजात तेढ निर्माण करता? अरे आपण सगळे माणूस आहोत, माणूस माणुसकी दाखवा."

देशाचे पंतप्रधान आमच्या पाठीशी -"शेवटी महायुती सरकारला सर्व जाती धर्माला न्याय द्यायचा आहे. आम्ही जाती पातीचे राजकारण करायला आलेलो नाहीत. आम्ही समाजाचे भले करायला आलो आहेत. देशाचे पंतप्रधान आमच्या पाठीशी आहेत. केंद्र सरकार आमच्या पाठीशी आहेत. राज्याचे मुख्यमंत्री सातत्याने काम करत आहेत. कुठल्याही विकास कामासंदर्भात कुणी काही अडथळा आणला, तर अधिकाऱ्यांना सांगतात इथे राजकारण करायचे नाही. इथे समाजाचे हीत बघायचे आहे. या पद्धतीने काम सुरू आहे," असेही अजित दादा यावेळी म्हणाले.

 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारrailwayरेल्वेNCPराष्ट्रवादी काँग्रेसBeedबीड