पुणे : दैनंदिन तिकीट विक्रीतून जमा होणारी सुमारे दीड ते दोन लाख रुपयांची चिल्लर स्वीकारण्यास बँकेने नकार दिला आहे. त्यामुळे पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी) प्रशासनासमोर या ‘चिल्लर’चे करायचे काय? असा वेगळाच पेच निर्माण झाला आहे. या ‘चिल्लर’ संकटामुळे प्रशासनही बुचकळ्यात पडले आहे.पीएमपीचे एकूण १३ आगार असून त्यामार्फत बसचे दैनंदिन संचलन चालविले जाते. या आगारांमधील बस संचलनातून दररोज जमा होणारी रक्कम सेंट्रल बँक आॅफ इंडियाच्या कॅम्प शाखेतील महामंडळाच्या खात्यात जमा केली जाते. तिकीट विक्रीतून दररोज दीड ते दोन लाख रुपयांची चिल्लर जमा होते. पण बँकेने ४ आॅक्टोबरपासून ही चिल्लर स्वीकारण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आगारांमध्ये चिल्लर साठवून ठेवावी लागत आहे. प्रशासनाकडून याबाबत बँकेशी सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. मात्र, त्यानंतरही बँकेने रिझर्व्ह बँकेचा हवाला देत ही रक्कम घेणार नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे प्रशासनाला मागील आठ दिवसांपासूनची जमा झालेल्या सुमारे १२ ते १५ लाख रुपयांच्या चिल्लरचा संबंधित आगारांमध्येच ढीग लावावा लागत आहे.
‘चिल्लर’ संकटामुळे ‘पीएमपी’ प्रशासनही बुचकळ्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2018 20:28 IST
दैनंदिन तिकीट विक्रीतून जमा होणारी सुमारे दीड ते दोन लाख रुपयांची चिल्लर स्वीकारण्यास बँकेने नकार दिला आहे.
‘चिल्लर’ संकटामुळे ‘पीएमपी’ प्रशासनही बुचकळ्यात
ठळक मुद्देदोन लाखांची चिल्लर स्वीकारण्यास बॅँकेचा नकारपीएमपीचे एकूण १३ आगार असून त्यामार्फत बसचे दैनंदिन संचलन जमा झालेल्या सुमारे १२ ते १५ लाख रुपयांच्या चिल्लरचा संबंधित आगारांमध्येच ढीगचिल्लर बँकेत जमा होत नसल्याने दैनंदिन खर्चावरही मर्यादा