शहरं
Join us  
Trending Stories
1
तिढा सुटला, विधान परिषद निवडणुकीतून काँग्रेसची माघार, अंबादास दानवे असतील मविआचे उमेदवार
2
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
3
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! उद्या शेअर बाजारात कामकाज होणार का? ट्रेडिंगपूर्वी चेक करा नवं हॉलिडे कॅलेंडर
4
मोठी बातमी! बच्चू कडू यांनी शिवसेनेचं धनुष्यबाण घेतले हाती; "झेंडा बदलला पण अजेंडा नाही.."
5
रियान परागला मोठा धक्का! ड्रेसिंग रूममध्ये स्मोकिंग केल्याप्रकरणी BCCIने केली कठोर कारवाई
6
खिशात कांदा ठेवल्याने खरोखरच 'उष्णता' लागत नाही का? जाणून घ्या उन्हाळ्यातील या सर्वात मोठ्या दाव्यामागचं वास्तव!
7
माचिसची काडी पेटवली अन् भडका उडाला, सिलेंडरच्या स्फोटात कुटुंबातील ७ जण होरपळले
8
काय म्हणावं आता! लग्नात इतक्या जोरात डीजे वाजवला की १४० कोंबड्या मेल्या; मालक चिडला अन्...
9
Sonam Raghuvanshi : “आम्ही वकील केला नाही, जामीनही नाही, जास्त त्रास दिला तर...”; सोनम रघुवंशीच्या भावाची धमकी
10
कर्ज फेडलं पण आता डूख धरून बसला पाकिस्तान; दुबईचा बदला घेणार, 'या' गर्भश्रीमंतला अटक करण्याची तयारी 
11
पुष्टिपती विनायक जयंती २०२६: नववर्षातील बाप्पाचा पहिला जन्मोत्सव; ‘या’ अवताराची कथा माहितीये का?
12
जिनिलियाने उलगडली 'राजा शिवाजी'च्या निर्मितीमागची गोष्ट; म्हणाली, "तडजोड केली नाही..."
13
सराफा बाजारात सोन्याचा दर किती? दागिने बनवायचे तर..., सोन्या-चांदीच्या किमतींत पुन्हा उसळी...
14
पेट्रोल ना डिझेल; 'या' कंपनीच्या इलेक्ट्रिक गाड्यांना मोठी मागणी, टाटा-महिंद्राला मागे टाकले...
15
$१ ची किंमत ₹९५.२०: डॉलरच्या समोर रुपया धराशाही; पहिल्यांदाच विक्रमी नीचांकी स्तरावर भारतीय चलन
16
अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली
17
‘शिवाजी कोण होता?’ उर्दू आवृत्तीच्या २५ हजारांवर प्रतींची विक्री, पुस्तक पोहोचले पाकिस्तानात
18
९० च्या दशकातील सर्वात सुंदर अभिनेत्री! जिच्या नावाने भारताने पाकिस्तानवर डागलेली मिसाईल
19
स्मार्टफोन जगतात मोठी खळबळ: OnePlus आणि Realme चं मर्जर होणार? पाहा डिटेल्स
20
कोल्हापुरी ब्रँड 'प्राडा'ने स्वीकारला, नवीन चप्पल बाजारात; ३० जणांना इटलीत प्रशिक्षणाची संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘प्राइम टाइम’ची शोभा!

By admin | Updated: April 9, 2015 02:56 IST

मल्टिप्लेक्समध्ये मराठी चित्रपटांना ‘प्राइम टाइम’ देण्याच्या सरकारच्या निर्णयावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हुकूमशहा संबोधणा-या प्रसिद्ध लेखिका शोभा डे

मुंबई : मल्टिप्लेक्समध्ये मराठी चित्रपटांना ‘प्राइम टाइम’ देण्याच्या सरकारच्या निर्णयावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हुकूमशहा संबोधणा-या प्रसिद्ध लेखिका शोभा डे यांच्याविरुद्ध विधानसभेत हक्कभंगाचा प्रस्ताव आणण्याचा प्रयत्न शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने केला; परंतु सभापती हरिभाऊ बागडे यांनी ती साफ फेटाळून लावला. राज्यातील मिल्टप्लेक्स सिनेमागृहांत प्राइम टाइममध्ये मराठी चित्रपट दाखविण्याची सक्ती केली जाईल, अशी घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी मंगळवारी करताच शोभा डे यांनी फडणवीस सरकार ‘हुकूमशहा’ असल्याचे ट्विट केले. ‘आधी गोवंश हत्याबंदी, आता मराठी सिनेमा, नको नको, ये सब रोको’, असे आणखी एक टिष्ट्वट करून त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. त्यामुळे बुधवारी डे यांच्याविरोधात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली. प्रताप सरनाईक यांनी प्रस्ताव आणला. जितेंद्र आव्हाड यांनी याबाबतची प्रतिक्रिया सभागृहाबाहेर दिली. परंतु हक्कभंगाची नोटीस द्यायला हवी, असे सांगत सभापतींनी प्रस्ताव फेटाळला. आपल्या विरोधात हक्कभंग आणला जात असल्याची माहिती मिळताच शोभा डे यांनी ‘हक्कभंगाचा प्रस्ताव आणला? कम आॅन, महाराष्ट्रीयन असल्याचा मला अभिमान आहे, तसेच माझे मराठी सिनेमांवर प्रेम आहे आणि ते नेहमीच राहील,’ असे आणखी एक टिष्ट्वट करून खिजवण्याचा प्रयत्न केला. यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीची भावना दुखावली, पण सत्ताधारी भाजपाचे आमदार, कार्यकर्ते मात्र मूग गिळून गप्प बसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. (विशेष प्रतिनिधी)