सासू - सासऱ्यांनी केली मारहाण; गळफास घेऊन युवकाची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2022 13:29 IST2022-11-26T13:28:32+5:302022-11-26T13:29:15+5:30
ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या सिरसो येथील युवकाने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना

सासू - सासऱ्यांनी केली मारहाण; गळफास घेऊन युवकाची आत्महत्या
मूर्तिजापूर :
ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या सिरसो येथील युवकाने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजताच्या दरम्यान घडली. हितेश बबनराव मोरे (२७) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.
सिरसो येथील २७ वर्षीय युवक हितेश (छोटू) बबनराव मोरे याने आपल्या राहत्या घरात घरी कोणीच नसताना छताच्या पंख्याला स्वेटरने गळफास घेऊन जीवन यात्रा संपवली. हितेश याची पत्नी दोन लहान मुलींना घेऊन काही महिन्यांपूर्वी माहेरी निघून गेली, मुलांना भेटण्यासाठी हितेश शुक्रवारी सासुरवाडीत गेला होता, दद्वतच पत्नी व मुलींना घेऊन या बेताने तो गेला होता, दरम्यान शनिवारी सकाळी ११ वाजता हितेश याने आत्महत्या करण्यापूर्वी पोलिसांना फोन करुन मुलींना भेटू न देता आपल्या सासू व साऱ्यांनी मारहाण केली म्हणून आपण आत्महत्या करीत असल्याचे सांगितले. सदर प्रकार पोलीस हितेशच्या घरी पोहोचल्यावर शेजाऱ्यांना समजला पोलीसांनी घराचे दार तोडून बघीतले तर तोपर्यंत हितेश गतप्राण झाला होता, हितेश याला एक चार वर्षांची व दोन वर्षाची मुलगी आहे. या प्रकरणी ग्रामीण पोलीस तपास करीत आहेत.