शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

बॅ. अंतुले यांच्यावर अंत्यसंस्कार

By admin | Updated: December 4, 2014 02:52 IST

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीय मंत्री बॅ. ए.आर. अंतुले यांच्यावर बुधवारी दुपारी दोन वाजता आंबेत (तालुका म्हसळा) या त्यांच्या जन्मगावी अंत्यसंस्कार करण्यात आले.

म्हसळा : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीय मंत्री बॅ. ए.आर. अंतुले यांच्यावर बुधवारी दुपारी दोन वाजता आंबेत (तालुका म्हसळा) या त्यांच्या जन्मगावी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे पार्थिव मंगळवारी मुंबईहून आंबेतला नेण्यात आले होते. या वेळी हजारोंच्या समुदायाने त्यांचे अंत्यदर्शन घेतले. संपूर्ण शासकीय इतमामात झालेल्या या अंत्यविधीच्या वेळी २० पोलिसांच्या तुकडीने त्यांना तीन फैरींची सलामी दिली. बॅ. अंतुले यांच्या अंत्यदर्शनासाठी केवळ कोकणातूनच नव्हे तर देशातील विविध राज्यांतून त्यांचे चाहते आंबेतमध्ये दाखल झाले होते. त्यांचे पार्थिव त्यांच्या निवासस्थानाच्या प्रांगणात ठेवण्यात आले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे, केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गिते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रीय काँग्रेस कार्यकारिणीचे सदस्य व माजी केंद्रीय मंत्री आॅस्कर फर्नांडिस, विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी मंत्री पतंगराव कदम, राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, विलासकाका उंडाळकर, नारायण राणे, आमदार पंडितशेठ पाटील, आ. अवधूत तटकरे, आ. भरतशेठ गोगावले, आ. प्रशांत ठाकूर, रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष आर. सी. घरत, माजी आमदार मीनाक्षी पाटील, माणिक जगताप, कृपाशंकर सिंह आदींनी अंतुले यांना श्रद्धांजली वाहिली. शोकसभेत अनेकांनी अंतुले यांच्या कार्याचे विविध पैलू उलगडून दाखवले. (विशेष प्रतिनिधी)