शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जुलैचे भविष्य ३० जुलैला खरे होणार? रशियातील भुकंपाच्या उंच लाटा जपानच्या किनाऱ्यावर धडकू लागल्या...
2
"दीड लाख देऊन इथं आलोय, मला बोलू द्या..."; संसदेत हजेरी लावणं खासदार राशीद यांना इतकं महाग का पडलं?
3
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात; Sensex १९० अंकांपेक्षा जास्त वधारला, 'या' शेअर्समध्ये तेजी
4
राज ठाकरे ‘मातोश्री’वर गेले, उद्धव ठाकरे ‘शिवतीर्थ’वर कधी जाणार? ‘ते’ मुहूर्त तर हुकले, आता...
5
पोस्टाची 'ही' स्कीम हलक्यात घेऊ नका; थोडी थोडी गुंतवणूक करून जमवू शकता १७ लाखांचा फंड
6
खळबळजनक! HIV पॉझिटिव्ह अन् कर्जबाजारी होता भाऊ; रक्षाबंधनाच्या आधी बहीण झाली निष्ठूर
7
विवाहित पुरुषापासून दूर रहा...! कोर्टाचा महिलेला अजब आदेश, स्वत: विवाहित होती, तरी तिला...
8
नेपाळमध्ये ISI उभं करतंय नेटवर्क, 'बांगलादेशी मॉडेल'चा वापर; 'असा' रचला जातोय भारताविरोधी कट
9
अरे देवा! मुलगा वर्गात झोपला अन् शाळेला कुलूप लावून शिक्षक गेले घरी, जाग आल्यावर घाबरून...
10
९ महिन्यापूर्वी लव्ह मॅरेज अन् आज फेसबुकवर शेवटचा मेसेज लिहून जोडप्यानं संपवलं आयुष्य
11
शिवानी सोनारने घरी आणली Tata कंपनीची नवी कोरी कार, गाडीची किंमत माहितीये?
12
मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल
13
दागिन्यांनी मढवलेल्या पत्नीला बुलेटच्या टाकीवर बसवून फिरवलं, पोलिसांनी थेट १६००० हजारांचं चलान कापलं!
14
Video: रशियाच्या समुद्राखाली शक्तीशाली भूकंप! कुरील आयलंडवर त्सुनामी; अमेरिका, जपान, न्यूझीलंडसह जगाला धोका
15
नात्यांना काळीमा फासणारी घटना; रेशन कार्ड बनवण्याच्या बहाण्याने घेऊन गेला अन् बायको पोरांना विकून आला!
16
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
17
लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद
18
भारताने लवकर व्यापार करार करावा, अन्यथा २५% टॅरिफ लादू! डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा धमकी
19
‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा, असे जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी
20
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टप्प्याटप्प्याने घेणार; आधी जिल्हा परिषद, नंतर मनपा होणार

बारामती : कोरोना नियंत्रणात न आल्यास कडक निर्बंधांचा विचार - अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2021 14:58 IST

मास्क परिधान न करणारे, गर्दी करणाऱ्यांवर कारवाई करण्याचेही आदेश

ठळक मुद्देमास्क परिधान न करणारे, गर्दी करणाऱ्यांवर कारवाई करण्याचेही आदेशलसीकरणाचाही वेग वाढवण्याचे निर्देश

बारामती : "बारामती  तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे, पुढील दिवसात कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात न आल्यास कडक निर्बंध लागू करण्याचा विचार करावा लागेल," असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज आढावा बैठकीत दिला.  बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली 'कोरोना विषाणू निर्मूलन आढावा बैठकी’चे आयोजन करण्यात आले होते.  त्यावेळी ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष पौर्णिमा तावरे, पंचायत समितीच्या सभापती नीता फरांदे, अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, महावितरणचे मुख्य अभियंता सुनिल पावडे यांसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. "सद्यस्थितीत बारामती तालुक्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढतच आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात न आल्यास कडक निर्बंध लागू करण्याचा, विचार करावा लागेल," असे पवार यावेळी म्हणाले."ज्याठिकाणी कोरोनाचे रुग्ण जास्त आहेत त्या ठिकाणी हॉटस्पॉट घोषित करा. ते करतांना नगरसेवकांना विश्वासात घ्या. ग्रामीण भागात सर्वेक्षण करण्यावर भर द्या, पुणे जिल्हा परिषदेने ज्याप्रकारे कोरोना अपडेटसाठी  तयार केले आहे त्याच धर्तीवर बारामती तालुक्यासाठीही ॲप तयार करा. जेणेकरून कोरोनाची सद्यस्थिती आणि बेडची उपलब्धतेबाबत नागरिकांना माहिती मिळणे सुलभ होईल, अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करावे, नागरिकांपर्यंत पोहचून कोरोनाबाबत जनजागृती करावी, ऑक्सीजन बेडची कमतरता भासणार नाही,  याची दक्षता घ्यावी," असंही ते यावेळी म्हणाले.  गर्दी करणाऱ्यांवर, मास्क न घालणाऱ्यांवर कारवाई"बारामती शहरात काही नागरिक मास्क वापरताना दिसत नाहीत. कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करतांना दिसत नाहीत. बाजाराच्या ठिकाणी गर्दी करत आहेत. यावर प्रशासनाने कडक उपाययोजना करुन दंडात्मक कारवाई करावी.  सार्वजनिक ठिकाणी तसेच अन्यत्र गर्दी होणार नाही आणि सुरक्षित अंतर राखले जाईल, याची सर्वांनीच दक्षता घेणे आवश्यक आहे. लग्नसमारंभ आणि अन्य कार्यक्रमासाठी  नियमानुसार लोकांची संख्या मर्यादित ठेवणे अपेक्षित आहे, याकडे विशेष लक्ष द्यावे. लसीकरणाचा वेग वाढवावा. सॅनिटायझरचा वापर करावा, कोरोनाशी लढण्याकरीता आवश्यक असणाऱ्या वैद्यकीय साधनसामुग्रीची  चांगल्या प्रतीची खरेदी करावी. त्यासाठी निधीची कमतरता भासणार नाही,  याचीही प्रशासनाने खबरदारी घ्यावी," असेही ते म्हणाले. ‘कोरोना’ संसर्गाची साखळी तोडण्यासाठी सर्वांनी गांभीर्याने काळजी घेण्याची आवश्यकता आहे. सामाजिक अंतर ठेवणे, हात वारंवार धुणे, गर्दी  टाळणे या त्रिसुत्रीवर भर देत नागरीकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केलं. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसPuneपुणेBaramatiबारामतीcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस