भाजपचे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी बारामती 'टार्गेट': गोपीचंद पडळकर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2020 04:48 PM2020-06-23T16:48:33+5:302020-06-23T16:50:32+5:30

राज्यसरकारने आश्वासने आणि टीका करण्याशिवाय काहीच केले नाही...

Baramati target by bjp in 2024 loksabha elections: Gopichand Padalakar | भाजपचे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी बारामती 'टार्गेट': गोपीचंद पडळकर

भाजपचे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी बारामती 'टार्गेट': गोपीचंद पडळकर

Next
ठळक मुद्देधनगर आरक्षणासाठी रस्त्यावर उतरणार

बारामतीबारामती विधानसभा मतदारसंघात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी मला संधी दिली.त्यांचा विश्वास होता, मी येथे ठामपणे उभा राहु शकतो,त्यांच्या आदेशाने निवडणुक लढविली.मला यश आले नाही. माझे डिपॉझिट जप्त झाले.त्याबद्दल पक्षाकडे दिलगिरी व्यक्त करतो.पक्षाने दाखविलेल्या विश्वासाला मी पात्र राहु शकलो नाही, पक्षाने आदेश दिल्याने आज कार्यकर्त्यांच्या भेटीसाटी आलो आहे. बारामती,इंदापुर,दौंड मध्ये महिन्यातुन पंधरा दिवसातुन येणार आहे.२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या वतीने उमेदवारी मिळालेल्या उमेदवाराला निवडुन आणणार असल्याचे
विधानपरिषदेचे भाजप आमदार गोपिचंद पडळकर यांनी सांगितले.

बारामतीमध्ये कार्यकर्ता भेटीसाठी आयोजित दौऱ्यामध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांनी पत्रकारांशी बोलताना संवाद साधला.यावेळी पडळकर यांनी २०१९ पाठोपाठ २०१४ ची बारामती लोकसभा मतदारसंघातील निवडुकीसाठी लक्ष घालणार असल्याचे संकेत दिले.सभागृहात चर्चा न झालेले बारामतीचे विषय सभागृहात मांडणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी पडळकर म्हणाले, राज्य सरकार कोरोना काळात अपेक्षित मदत केली नाही.हे राज्य सरकारचे मोठे अपयश आहे. राज्य सरकारकडे १ लाख कोटी ,तर मुंबई महानगरपालिकेकडे ६३ हजार कोटी ठेवी पडुन आहे.मात्र,राज्यातील १२ बलुतेदारांना मदतीची गरज होती. कर्नाटक सरकारने केंद्र सरकार सोडुन स्वत: चे १० हजार कोटीचे पॅकेज तेथील उपेक्षित वंचित घटाकांना दिले.तिथे रिक्षा व्यावसायिक,नाभिक समाजाला पैसे दिले.मात्र, येथील राज्य सरकारने बोलण्याशिवाय काही केले नाही. शेतकरी कोरोनामध्ये अडचणीत आला आहे. हे सरकार शेतकरी विरोधी आहे.गप्पा मारणारे आहे. केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी,देवेंद्र फडवणीस यांच्यावर टीका करणे,माध्यमांशी बोलण्यावरच राज्यकर्त्यांचा भर आहेे. राज्यात आम्हीच  किंगमेकर आहोत असे हे सरकार सांगत आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार मागील अवकाळी च्या वेळी नाशिकला गेले.मात्र, तेथील शेतकऱ्यांना एक रुपया मदत मिळाली नाही.चक्री वादळात कोकणात मोठे नुकसान झाले.त्यानंतर ज्येष्ठ नेते पवार कोकणातील लोेकांना भेट देण्यासाठी गेले होते.तेथील लोकांना देखील मदत मिळालेली नाही. कोरोनाच्या काळता केवळ राजकारण केले आहे.सरकारमध्ये एकमत नाही मेळ नाही.सरकार स्थापना ‘कॉमन मिनीमम प्रोग्राम’वर करण्यात आली.तो प्रोग्राम राज्य सरकारलाच माहिती नाही.तो त्यांनी जनतेला समजुन सांगावा,असा टोला पडळकर यांनी लगावला. मागच्या सरकारने १ हजार कोटी धनगर समाजासाठी तरतुद केली होती,त्याकडे या सरकारने दुर्लक्ष केले.धनगर समाजासाठी एक रुपया देखील अर्थसंकल्पात ठेवलेला नाही. भाजपच्या नावाने जातीयवादाचे बोंंब मारणारा राष्ट्रवादी काँग्रेस जातीयवादी आहे.त्याबाबत अनेक दाखले देता येतील.बारामती शहरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या नावाने असणारे उद्यान उद्धवस्त करण्यात आले आहे.त्यांची जातीयवादी नियत त्यावरुन उघड झाल्याची टीका आमदार पडळकर यांनी केली.यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब गावडे,दिलीप खैरे, अविनाश मोटे,पांडुरंग कचरे,सतीश फाळके,अभिमन्यू गुळुमकर आदी उपस्थित
होते.
——————————————
...धनगर आरक्षणासाठी रस्त्यावर उतरणार
अधिवेशन ३ आॅगस्टला सुरु होत आहे.धनगर आरक्षणाचा प्रश्न जिव्हाळ्याचा आहे. १०० टक्के हे आरक्षण मिळविण्यासाठी सभागृह आणि रस्त्यावरची लढाई लढणार असल्याचा इशारा आमदार गोपिचंद पडळकर यांनी दिला.
—————————————
 ...मेंढपाळांच्या सुरक्षेसाठी कायदा करण्याची गरज
मेंढपाळांवरील होणारे हल्ले हा गंभीर प्रश्न आहे. मेंढपाळांच्या
सुरक्षेसाठी कायदा करण्याची गरज आहे.याबाबत आपण सभागृहात मागणी करणार आहे.मेंढपाळांच्या विकासासाठी आवश्यक पावले टाकण्यासाठी शासन उदासीन आहे.डॉक्टर,पत्रकारांप्रमाणे मेंढपाळांवरील हल्ल्याबाबत करण्यासाठी आवाज उठविणार आहे. लॉकडाऊन नंतर मेंढपाळांसाठी दहा दिवसांंचा दौरा काढणार आहे.त्यासाठी मेंढपाळांच्या वाड्यावर  पालावर मुक्काम करणार,त्यांचे प्रश्न जाणुन घेणार असल्याचे गोपिचंद पडळकर यांनी सांगितले.
——————————————

Web Title: Baramati target by bjp in 2024 loksabha elections: Gopichand Padalakar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.