सांगली : भाजपचे जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) नेते जयंत पाटील यांच्याविषयी पातळी सोडून केलेल्या वक्तव्यांमुळे सांगली जिल्ह्यासह राज्यपातळीवरूनही निषेध व्यक्त होत आहे. जिल्ह्यात इस्लामपूर, जत, सांगली, विटा आदी ठिकाणी पडळकर यांच्याविरोधात जोरदार आंदोलने झाली. मोर्चे काढून निषेध करण्यात आला. यावेळी बापू बिरू वाटेगावकर यांचा मुलगा शिवाजी वाटेगावकर यांनी पडळकरांवर जोरदार हल्लाबोल करत थेट इशारा देत दमच दिला.शिवाजी वाटेगावकर म्हणाले, अरे टोपीचंद संत बाळूमामा व बापू बिरु यांच्या नावाने तू राजकारण करतोस.. त्यांनी समाजासाठी काय काम केले ते बघा आणि तुम्ही समाजासाठी काय करताय ते बघा?. आम्ही बोलतो थोडकच बोलतो पण कार्यक्रमच करतो. जयंत पाटालांविरूद्ध काहीतरी बोलतो. तो माणूस तुला काही आलतू फालतू वाटला का, नाही त्या माणसाच्या नादाला लागू नको, तुझी चड्डी सुद्धा ठेवणार नाही, असं म्हणत शिवाजी वाटेगावकर यांनी पडळकरांना इशारा दिला.पुढे बोलताना म्हणाले, मी त्याला गोपीपंद सुद्दा म्हणू शकत नाही, कारण त्याची लायकी नाही. समाजात काही काडीचीही किंमत नाही. धनगर समाजाला त्यानं मान खाली घालायला लावली. बापूंसारख्यांवर तो बोलतो एवढा मोठा झाला का तू.. असं म्हणत त्यांनी जोरदार हल्लाबोल केला.या प्रकरणावर खुद्द शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरून चर्चा केली असून फडणवीसांनी पडळकरांना समज देखील दिला आहे.
वाचा - "काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कानबेडग, कासेगावात पडळकर यांच्या प्रतिमेचे दहनकासेगाव व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्यावतीने शुक्रवारी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला जोडे मारून प्रतिमेचे दहन करण्यात आले. बेडग (ता. मिरज) येथे निषेध रॅली काढून त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज चौक येथे आल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून प्रतीकात्मक पुतळ्याला जोडे मारण्यात आले त्यांनतर त्या पुतळ्याचे दहन करण्यात आले.
वाचा- पितळ उघडे होऊ नये म्हणून पडळकर आंदोलनात उतरले, विक्रम सावंत यांचा आरोप जयंत पाटील यांचे मात्र ‘नो कॉमेन्ट्स’जयंत पाटील यांच्याबाबत बोलताना पडळकर यांनी त्यांच्या वडिलांविषयी अश्लाघ्य शब्दांत भाष्य केले. याविरोधात राज्यभर रान उठले असताना खुद्द जयंत पाटील मात्र शांत आहेत. त्यांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी शांत राहणेच पसंत केले. सांगलीमध्ये एका कार्यक्रमासाठी आले असता त्यांना पडळकरांच्या टीकेबाबत विचारणा झाली, त्यावेळी ते म्हणाले, ‘मी काहीही बोलणार नाही. जे काय चाललंय ते तुम्हीच बघा.’