शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

बँकांनी जनतेचा विश्वास अबाधित ठेवावा : राष्ट्रपती रामनाथ कोविंद  

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2020 17:49 IST

सार्वजनिक पैशाचे संरक्षण करण्याची मोठी जबाबदारी बँकांकडे

ठळक मुद्देएनआयबीएन संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रतिपादन

पुणे : देशाच्या आर्थिक विकासात बँका महत्त्वाची भूमिका पार पाडत असून सार्वजनिक पैशाचे संरक्षण करण्याची मोठी जबाबदारी बँकांकडे आहे.त्याचप्रमाणे जनतेचा बँकेवर असलेला विश्वास अबाधित ठेवण्यासाठी बँकांनी कायम प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे. तसेच देशाच्या वाढत्या अर्थ व्यवस्थेचा विचार करता जगातील पहिल्या 100 बँकांच्या यादीत भारतातील एका बँकेचे नाव यावे, असे ध्येय आपण ठेवले पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी बुधवारी केले.     नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बँक मॅनेजमेंट (एनआयबीएम)संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात राम नाथ कोविंद बोलत होते. यावेळी राष्ट्रपती कोविंद यांच्या पत्नी सौ.सविता कोविंद,राज्यपाल भगतसिंह कोश्यारी,राज्याचे परिवहन मंत्री अ‍ॅड. अनिल परब, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तीकांत दास, एनआयबीएमचे संचालक डॉ. के. एल. धिंग्रा आदी उपस्थित होते.         राष्ट्रपती कोविंद म्हणाले, देशाच्या आर्थिक विकासाला चालना देण्यामध्ये बँकांनी उत्कृष्ट भूमिका बजावली आहे. बँक व्यवस्थापनात संशोधन, प्रशिक्षण, शिक्षण आणि सल्ला यासाठी स्वायत्त शिखर संस्था म्हणून एनआयबीएम महत्त्वाचे काम करत .तसेच एनआयबीएममध्ये चांगल्या संशोधन सुविधा असून या सुविधांचा उपयोग गरीब घटकांसाठी आर्थिक उत्पादने तयार करण्यासाठी केला पाहिजे. त्याचप्रमाणे जागतिकस्तरावरील कुशल मन्युष्यबळ एनआयबीएममधून तयार व्हावे. त्याचप्रमाणे देशातील अर्थिक असमानता दूर करण्यासाठी बँकांनी काही भौगोलिक भाग दत्तक घ्यावा.माहिती व तंत्रज्ञानाच्या सहाय्याने संशोधन करून बँक व्यवस्थेत आवश्यक सुधारणा कराव्यात,अशी अपेक्षाही कोविंद यांनी यावेळी व्यक्त केली.कार्यक्रमात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते एनआयबीएम संस्थेच्या कार्याच्या माहिती पुस्तिकेचे, टपाल तिकीटाचे व संस्थेच्या नव्या लोगोचे अनावरण करण्यात आले.यावेळी आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी  आर्थिक क्षेत्रात राष्ट्रीय बँक व्यवस्थापन संस्थेचे महत्वपूर्ण योगदान असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. के. एल. धिंग्रा यांनी केले.-----------------* दिव्यांग व्यक्तींना सोयीसुविधा द्या..   देशाच्या एकूण लोकसंख्येच्या दोन टक्के लोक दिव्यांग असून या दिव्यांग व्यक्तींमध्ये प्रचंड क्षमता आहे. दिव्यांग व्यक्तींना मुख्य आर्थिक प्रवाहात आणण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत. आरबीआयने ‘दिव्यांग’ व्यक्तींना बँकिंग सुविधांमध्ये सहज प्रवेश मिळण्यासाठी मार्गदर्शक सूचना प्रसिध्द केल्या आहेत. दिव्यांग व्यक्तींना बँकेतील सर्व सेवा अधिक चांगल्या पध्दतीने मिळाव्यात यासाठी आरबीआयने स्वत: पुढाकार घ्यावा, असेही राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेRamnath Kovindरामनाथ कोविंदReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँकbankबँक