शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
2
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
3
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
4
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
5
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
6
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
7
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
8
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
9
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
10
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
11
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
12
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
13
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
14
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
15
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
16
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
17
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
18
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
19
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
20
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
Daily Top 2Weekly Top 5

अवघ्या ५०० ते १००० रुपयांत बांगलादेशी बनताहेत भारतीय; ११ महिन्यांत १५६ जण हद्दपार; ६ महिलांचे प्रत्यार्पण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 07:19 IST

गेल्या अकरा महिन्यांत मुंबईतून अशा १५६ बांगलादेशींना हद्दपार करण्यात आले, तर ६ महिलांचे प्रत्यार्पण करण्यात आले आहे. 

मुंबई : बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराचे पडसाद संपूर्ण देशभरात उमटत आहेत. अशात तेथील गरिबी आणि उपासमारीला कंटाळून अनेक बांगलादेशी घुसखोर अवैध मार्गाने आंतरराष्ट्रीय सीमा रेषा ओलांडून भारतात येत आहे, तसेच ते अवघ्या पाचशे ते दोन हजारांत ते भारतीय ओळखपत्र आणि इतर आवश्यक कागदपत्रे बनवत असल्याचे चौकशीत समोर आले. गेल्या अकरा महिन्यांत मुंबईतून अशा १५६ बांगलादेशींना हद्दपार करण्यात आले, तर ६ महिलांचे प्रत्यार्पण करण्यात आले आहे. 

राज्य दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) गेल्या आठवड्यात मुंबईसह ठाणे, नवी मुंबई आणि सोलापूर, नाशिक जिल्ह्यात विशेष मोहीम राबवून महिनाभरात ४३ बांगलादेशींना अटक केली. भारतातील वास्तव्यासाठी या आरोपींनी बनावट कागदपत्रांआधारे आधार कार्ड, पॅन कार्ड बनवून घेतल्याचे उघड होते. विशेष शाखा एकच्या आय शाखेकडून २०२४ मध्ये सजामुक्त बांगलादेशी नागरिकांवरील कारवाई अहवालानुसार, अकरा महिन्यांत १५६ जणांवर हद्दपारची कारवाई केली आहे. यापैकी फक्त सहा बांगलादेशीचे प्रत्यार्पण करण्यात आले. यापैकी काही जण पाचशे ते दोन हजारांत भारतीय कागदपत्रे मिळवल्याचे तपासात समोर येत आहे. गेल्या वर्षी एकट्या मुंबईतून ३६८ बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली होती. त्यापूर्वी २०२२ मध्ये मुंबईतून १४७ बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली होती. 

संपूर्ण साखळीविरोधात कारवाईबांगलादेशी नागरिकांना अटक केल्यानंतर त्यांना मायदेशी पाठण्याच्या प्रक्रियेला अनेक वर्षे लागतात. त्या काळात घुसखोर बांगलादेशी नागरिक विविध सरकारी योजनांचा फायदा घेतात. त्यांच्या इतर बांगलादेशी घुसखोरांना भारतात स्थायिक करण्याचे बेकायदेशीर काम ते करतात. त्यामुळे घुसखोरांना कागदपत्रे व मदत पुरवणाऱ्या संपूर्ण साखळीविरोधातच कारवाई करण्यास एटीएसने सुरुवात केली आहे. 

त्या अंतर्गत संशयित बांगलादेशी नागरिकांची बँक खाते बंद करण्याबाबत बँकांना नोटीस पाठवण्यास सुरुवात करण्यात आली आहे, तसेच शिधापत्रिका, चालक परवाने रद्द करण्याबाबतही संबंधित विभागांशी पत्रव्यवहार केला जाताे.

- गेल्या तीन वर्षांत ६९६ बांगलादेशी नागरिकांना अटक- २२२  बांगलादेशी मायदेशी रिटर्न...

भिवंडीत वाढतोय वावर गेल्या ११ महिन्यांमध्ये ठाणे शहर आयुक्तालयाने ५० हून अधिक बांगलादेशींना जेरबंद केले. भिवंडीमध्ये उत्तर प्रदेश, बिहारचाही मुस्लिम वर्ग असल्यामुळे त्यांच्यात बांगलादेशी सहज मिसळतात. त्यामुळे बांगलादेशींना नेमके शोधून काढून त्यांच्यावर कारवाईचे आव्हान पोलिसांपुढे आहे.

 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रBangladeshबांगलादेशIndiaभारतinfiltrationघुसखोरी