शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
3
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
4
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
5
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
6
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
7
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
8
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
9
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
10
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
11
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
12
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
13
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
14
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
15
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
16
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
17
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
18
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
19
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
20
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

भरतीच्या वेळी केळी अन् ग्लुकोज

By admin | Updated: June 20, 2014 02:18 IST

पोलीस भरतीदरम्यान पाच उमेदवारांचा मृत्यू झाल्यानंतर पोलीस महासंचालकांनी आता भरतीसाठी नवी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.

 यवतमाळ : पोलीस भरतीदरम्यान पाच उमेदवारांचा मृत्यू झाल्यानंतर पोलीस महासंचालकांनी आता भरतीसाठी नवी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. आता धावण्यापूर्वी उमेदवाराची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. भरतीसाठी खबरदारी म्हणून महासंचालकांनी नवी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली असून, यापुढील भरती या तत्त्वांनुसार करण्याचे आदेश आहेत.

बुधवारी रात्री पोलीस महासंचालक कार्यालयातून भरतीबाबतची ही मार्गदर्शक तत्त्वे बिनतारी संदेश यंत्रद्वारे जारी करण्यात आली. पोलीस भरतीत शारीरिक क्षमता चाचणीदरम्यान पुरुषांसाठी 5 किलोमीटर तर महिलांसाठी 3 किलोमीटर रनिंग असते. या रनिंगपूर्वी प्रत्येक उमेदवाराची वैद्यकीय तपासणी केली जाईल. तो धावण्यासाठी सक्षम आहे अथवा नाही हे तपासले जाईल. सक्षम नसल्यास त्याला रनिंग करू देऊ नका, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
 वैद्यकीय तपासणीअंती पात्र ठरलेल्या उमेदवारांना रनिंगपूर्वी दोन केळी आणि ग्लुकोज पावडर देणो बंधनकारक करण्यात आले आहे. ही रनिंग कोणत्याही परिस्थितीत सकाळी 8 पूर्वी आणि सायंकाळी 4.3क् नंतर घ्यावी. शारीरिक क्षमता चाचणी सकाळी 8 ते सायंकाळी 4.3क् या वेळात घेतली जाऊ नये, असे आदेश महासंचालकांनी जारी केले आहेत. 
या वर्षी रखरखत्या उन्हाळ्यात राज्यातील सर्वच जिल्ह्यात पोलीस भरती घेण्यात आली. शारीरिक क्षमता चाचणीसह त्यांची लेखी परीक्षाही खुल्या मैदानात घेतली गेली. या भरतीत मुंबईमध्ये पाठोपाठ पाच उमेदवारांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यभर खळबळ निर्माण झाली. हिवाळ्यामध्ये ही भरती घेणो अपेक्षित असताना उन्हाळ्यातच का घेतली गेली, म्हणून महासंचालक कार्यालयाला धारेवर धरले गेले. अन्य जिल्ह्यातसुद्धा अनेक उमेदवार शारीरिक क्षमता चाचणीदरम्यान भोवळ येऊन पडल्याची उदाहरणो आहेत. काही ठिकाणी ही भरती प्रक्रिया पूर्ण झाली असली तरी अनेक ठिकाणी अद्यापही अधिक जागांमुळे प्रक्रिया सुरूच आहे. (प्रतिनिधी)