शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

बालभारतीमार्फत विद्यार्थ्यांना पुस्तक वितरणास सुरुवात; ऑनलाइन नोंदणी उपलब्ध

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2020 16:41 IST

राज्यातील सर्व भांडारांमधून पाठ्यपुस्तकांची विक्री सुरू

ठळक मुद्देऑनलाईन पद्धतीने 24 तासात केव्हाही मंडळाकडे पुस्तकांची मागणी नोंदवता येणारविद्यार्थ्यांकडून सुमारे 81 लाख पुस्तकांच्या पीडीएफ फाईल्स झाल्या डाऊनलोड

पुणे : महाराष्ट्र राज्य पाठयपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ (बालभारती) मार्फत शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये राज्यातील इयत्ता पहिली ते आठवीच्या लाभार्थी असलेल्या विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा अभियानाच्या माध्यमातून आणि लाभार्थी नसलेल्या इयत्ता १ ली ते ११ वी च्या विद्यार्थ्यांना खुल्या बाजारामध्ये पुस्तक विक्रेत्यांमार्फत शनिवारीपासूनपाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्यास सुरुवात करण्यात आली. शालेय शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांच्या हस्ते पाठ्यपुस्तक मंडळाच्या पुणे विभागीय भांडारातून पाठ्यपुस्तकांच्या  वितरणास  सुरुवात झाली. यावेळी प्राथमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप,वित्त व लेखा अधिकारी अंकुश नवले, किशोर मासिकाचे संपादक किरण केंद्रे, पुणे भांडार व्यवस्थापक विनोद अस्मर आदी उपस्थित होते. समग्र शिक्षा अभियानानंतर्गत इयत्ता पहिली ते आठवीसाठी शासकीय व स्थानिक स्वराज संस्था तसेच खाजगी अनुदानित शाळांना पुणे विभागात ९५,९०,३२४ इतक्या प्रतींचे वितरण केले जाणार आहे. तसेच खुल्या बाजारात पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत.-----------पीडीएफ पुस्तकांना विद्यार्थ्यांकडून प्रतिसादबालभारतीतर्फे खासगी व विनाअनुदानित शाळांमधील इयत्ता पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांकरता पाठ्यपुस्तके खुल्या बाजारातून पुस्तक विक्रेत्यांमार्फत उपलब्ध करून दिली जातात. संपूर्ण राज्यामध्ये लॉकडाऊन असल्यामुळे  इयत्ता 1 ली ते इयत्ता 12 वी च्या सर्व पाठ्यपुस्तकांच्या  पीडीएफ फाईल्स मंडळाच्या वेबसाईटवर विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. पीडीएफ पुस्तकांना विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला असून सुमारे 81 लाख पीडीएफ झाल्या डाऊनलोड आल्या आहेत.त्यात आजपर्यंत इयत्ता बारावीच्या 20 लाख 54 हजार 194 व इयत्ता 1 ली ते 11 वी च्या 61लाख 20 हजार 753 पीडीएफ फाईल्स डाऊनलोड केल्या गेल्या आहेत,असे असुनसुद्धा मोठ्या प्रमाणात पाठ्यपुस्तकांची मागणी होत असल्याने पाठ्यपुस्तकांची राज्यातील सर्व भांडारांमधून विक्री सुरू करण्यात आली . -----पाठ्यपुस्तकांसाठी करता येणार ऑनलाइन नोंदणीराज्यातील संचारबंदीच्या काळात मंडळाच्या भांडारात पाठ्यपुस्तक खरेदीसाठी गर्दी होऊ नये, म्हणून मंडळाकडे नोंदणीकृत असलेल्या पाठ्यपुस्तक विक्रेते व शैक्षणिक संस्थांकरिता ऑनलाइन पद्धतीने पुस्तकांची मागणी नोंदविण्याकरीता पाठ्यपुस्तक मंडळाने यंत्रणा विकसित केली आहे.  पुस्तक विक्रेते व शैक्षणिक संस्थांना भांडारात न येता ऑनलाईन पद्धतीने 24 तासात केव्हाही मंडळाकडे पुस्तकांची मागणी नोंदवता येणार आहे. त्यासाठी त्यांना कायमस्वरूपी युजर आयडी व पासवर्ड देण्यात येत असून त्याचा वापर करून पुस्तक विक्रेत्यांना मंडळाच्या  sales.ebalbharati.in या संकेतस्थळावरून पाठ्यपुस्तकांची ऑनलाईन मागणी नोंदविता येणार आहे.त्यामुळे वेळेची बचत होणार असून भांडारांमधील गर्दी टाळता येणे शक्य होणार आहे.

टॅग्स :PuneपुणेStudentविद्यार्थीSchoolशाळाEducationशिक्षणEducation Sectorशिक्षण क्षेत्र