Raj Thackeray: नाशिकमध्ये राज ठाकरेंकडून बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा; मनसे कार्यकर्त्यांना दिला ‘कानमंत्र’

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2021 02:04 PM2021-09-23T14:04:48+5:302021-09-23T14:10:59+5:30

तसेच नमस्कार देखील हात आखडल्यासारखे करता. तसं करू नका लोकांना वाटलं पाहिजे हा आपला आहे. उद्यापासून शाखेची जागा शोधा शाखा कुठे असावी.

Balasaheb Thackeray memories evoked by Raj Thackeray in Nashik | Raj Thackeray: नाशिकमध्ये राज ठाकरेंकडून बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा; मनसे कार्यकर्त्यांना दिला ‘कानमंत्र’

Raj Thackeray: नाशिकमध्ये राज ठाकरेंकडून बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा; मनसे कार्यकर्त्यांना दिला ‘कानमंत्र’

Next
ठळक मुद्देआपल्या काळात एकही भ्रष्टाचाराचे आरोप नव्हते तो आपला प्रामाणिकपणा होता. पुढच्या आठवाड्यात पुन्हा येईल तेव्हा आपल्याला आपलं काम काय हे सांगेल. शाखा अध्यक्ष नंतर गटाध्यक्ष नेमले जाणार तुम्हाला तुमच्या जबाबदाऱ्या सांगितल्या जातील

नाशिक – आगामी महापालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने मनसेने नाशिकवर पुन्हा एकदा लक्ष्य केंद्रीत केले आहे. नाशिकमध्ये शहरातील शाखाध्यक्ष पदाच्या नेमणूका पार पडल्यानंतर राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. शाखा अध्यक्ष म्हणून नेमणूक मान्य आहे का? परत कुठे येऊन पडलो म्हणू नका. तुम्हाला काय जबाबदारी येणार आहे याची कल्पना नाही अजूनही वेळ गेलेली नाही. पक्षाची शिस्त पाळावी लागणार ज्यांना बोलवलं त्यांनीच यायचं अशा सूचना राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिल्या.

यावेळी राज ठाकरे म्हणाले की, पक्षात जुनं नवीन असं काही नसतं, माणसं येत असतात आणि जात असतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे लोकसंग्रह वाढवणं आहे. बाळासाहेबांनी मला घरा बाहेरचे जोडे दाखवले त्यांनी विचारलं हे काय आहे, मी म्हणालो जोडे मात्र तेव्हा बाळासाहेब म्हणाले हे जोडे नाही तर ही आपली संपत्ती आहे. लोकांना नावाने ओळखता यायला हवं तरच लोक तुम्हाला ओळखतील. शाखा अध्यक्ष नंतर गटाध्यक्ष नेमले जाणार तुम्हाला तुमच्या जबाबदाऱ्या सांगितल्या जातील असं सांगत राज ठाकरेंनी बाळासाहेबांच्या सोबत काम करत असतानाच्या आठवणींना उजाळा दिला.

तसेच नमस्कार देखील हात आखडल्यासारखे करता. तसं करू नका लोकांना वाटलं पाहिजे हा आपला आहे. उद्या पासून शाखेची जागा शोधा शाखा कुठे असावी. शांतराम आमरे झाडाखाली बसलेले असायचे तिकडे लोक।गर्दी करायचे अस काम करा.आपल्या आपल्या भागात झाडे लावा. झाडे आपलं अस्तित्व आहे प्रत्येकाला ते दिसलायला हवे ते आपलं अस्तित्व दाखवतात. अजित पवार बोलताना म्हणाले पैसे न देता ज्याच्या सभेला गर्दी होती ते राज ठाकरेंचं भाषण. पण हे माझं नाही तुमचं कौतुक आहे. आपल्या काळात एकही भ्रष्टाचाराचे आरोप नव्हते तो आपला प्रामाणिकपणा होता. पुढच्या आठवाड्यात पुन्हा येईल तेव्हा आपल्याला आपलं काम काय हे सांगेल. तुम्ही माणसं ओळखा. जो आरखाडा देईल त्याप्रमाणे काम करावं लागेल अशी सूचनाही राज ठाकरेंनी दिली आहे.

नाशिकमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह पक्षाचे नेते अमित ठाकरे, बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे, अविनाश जाधव तसेच इतर महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित होते. नाशिकमध्ये मनसेत मोठे फेरबदल झाले आहेत. शहराध्यक्षपदी दिलीप दातीर यांची नियुक्ती केली गेली तर अंकुश पवार यांची जिल्हाध्यक्षपदावर नेमणूक करण्यात आली आहे. तर सचिन भोसले यांच्याकडे शहर समन्वयक, जिल्हाध्यक्ष ग्रामीणची जबाबदारी देण्यात आली आहे.

Web Title: Balasaheb Thackeray memories evoked by Raj Thackeray in Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.