शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

Balasaheb Thackeray Birth Anniversary ...अन् बाळासाहेबांनी केलं राज ठाकरेंचं दुसरं बारसं

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2019 10:36 IST

राज ठाकरेंनी सांगितलेला दुसऱ्या नामकरणाचा मजेशीर किस्सा

मुंबई: मनसेप्रमुखराज ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यातलं नातं संपूर्ण महाराष्ट्राला ठाऊक आहे. राज ठाकरेंनी शिवसेनेला रामराम करत मनसेची स्थापना केली. मात्र तरीही कायम बाळासाहेबच राज ठाकरेंचे दैवत राहिले. माझ्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलं आहे, हे राज ठाकरेंचे शिवसेनेला सोठचिठ्ठी देतानाचे शब्द होते. राज ठाकरे बाळासाहेबांच्या सावलीत लहानाचे मोठे झाले. विशेष म्हणजे बाळासाहेबांनीच राज ठाकरेंचं दुसरं बारसं केलं होतं. अन्यथा आज राज ठाकरे वेगळ्या नावानं ओळखले गेले असते. गेल्या वर्षी राज यांनी त्यांच्या दुसऱ्या नामकरणाचा किस्सा पुण्यातल्या एका कार्यक्रमात सांगितला होता. 'माझं आधीचं नाव स्वरराज होतं. मात्र बाळासाहेबांच्या सांगण्यावरुन मी राज या नावानं व्यंगचित्र काढू लागलो, अशा शब्दांमध्ये राज ठाकरे यांनी त्यांच्या दुसऱ्या बारशाची गंमत सांगितली. 'माझे वडील संगीतकार होते. त्यामुळे मुलगा संगीत क्षेत्रात काहीतरी करेल, असं त्यांना वाटत होतं. मात्र मला वेगळेच 'राग' येऊ लागले, अशी आठवण राज ठाकरे यांनी सांगितली. ती ऐकताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या स्वरराज करंडक स्पर्धेला उपस्थित असताना राज ठाकरे यांनी तरुणाशी संवाद साधला होता. 'मी पाळण्यात असताना वडिलांनी माझं नाव स्वरराज ठेवलं. वडील संगीतकार असल्यानं मुलगादेखील पुढे जाऊन संगीत क्षेत्रात काहीतरी करेल, या विचारानं वडिलांनी माझं नामकरण केलं. मात्र नंतर मला वेगळेच राग येऊ लागले आणि त्या रागाचं परिवर्तन वेगळ्याच ठिकाणी झालं. मात्र अजूनही स्वरराज हेच नाव माझ्या पासपोर्टवर आहे,' असं राज ठाकरे यांनी सांगितलं होतं.आपल्याला राज ठाकरे हे नाव बाळासाहेबांनी दिलं, अशी आठवण त्यांनी सांगितली. 'मी सुरुवातीला स्वरराज ठाकरे नावानं व्यंगचित्रं काढायचो. व्यंगचित्रातील माझ्या कारकिर्दीची सुरुवात त्याच नावानं झाली होती. मात्र सहा-आठ महिन्यांतच मला बाळासाहेबांनी नावात बदल करायला सांगितला. मी व्यंगचित्राच्या क्षेत्रातील कारकीर्द बाळ ठाकरे नावानं सुरू केली. त्यामुळे तू राज ठाकरे नावानं व्यंगचित्रं काढ, असं बाळासाहेबांनी मला सांगितलं आणि माझं बारसं झालं,' अशी आठवण राज ठाकरेंनी सांगताच उपस्थितांमध्ये हास्याची कारंजी उडाली होती.माझ्या घरात सर्वांची नावं संगीतातल्या विविध रागांवरुनच ठेवण्यात आली आहेत, असं राज ठाकरे यावेळी म्हणाले. 'माझ्या आईचं नाव मधुवंती आहे. तर बहिणीचं नाव जयजयवंती आहे. त्यामुळे माझं स्वरराज ठेवलं. मुलगा संगीतात कारकीर्द करेल, असं कुटुंबीयांनी वाटलं होतं. पण त्या रागाचं पुढे काहीच झालं नाही,' असं राज ठाकरे यांनी सांगितलं होतं.  

टॅग्स :Balasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरेRaj Thackerayराज ठाकरेShiv SenaशिवसेनाMNSमनसे