The bail application was rejected of vikram Bhave who suspect accused in the Dabholkar murder case | दाभोलकर हत्या प्रकरणातील संशयित आरोपी विक्रम भावेचा जामीन अर्ज फेटाळला 
दाभोलकर हत्या प्रकरणातील संशयित आरोपी विक्रम भावेचा जामीन अर्ज फेटाळला 

पुणे : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात संशयित आरोेपी म्हणून अटक करण्यात आलेले विक्रम भावे यांचा जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. बचाव पक्षाच्या वकिलांनी विक्रम भावेचा जामीन अर्ज मंजूर करण्यात यावी अशी मागणी जिल्हा सत्र न्यायालयाकडे केली होती. 
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ.नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी विक्रम भावे आणि वकील संजीव पुनाळेकर या दोघांना २६ मे  रोजी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) अटक केली होती. विक्रम भावेवर आरोपींना दाभोलकरांची ओळख करुन देणे, प्रत्यक्ष घटनास्थळाची रेकी करणे हे आरोप ठेवण्यात आले आहेत. 
संजीव पुनाळेकर यांचा जामीन अर्ज मंजूर करण्यात आला आहे. त्यांच्यावर दाभोलकर हत्याप्रकरणी पुरावे नष्ट करणे, आरोपींना मार्गदर्शन करण्याचे आरोप आहेत तर विक्रम भावेवर आरोपींना दाभोलकरांची ओळख करुन देणे, प्रत्यक्ष घटनास्थळाची रेकी करणे हे आरोप ठेवण्यात आले आहेत.. विक्रम भावे गडकरी रंगायतन स्फोटातील आरोपी आहे. तत्पूर्वी दाभोळकर यांच्याबाबत सर्व माहिती भावे याने रेकी करून त्यांना दिली. न्यायालयात दोन्ही पक्षाचा  युक्तिवाद झाल्यानंतर न्याायालयाने संशयित आरोपी विक्रम भावे याचा जामीन अर्ज फेटाळून लावला. 


 

English summary :
Narendra Dabholkar Murder Case: The bail application of Vikram Bhave, who was arrested as a suspected accused in the murder case of Narendra Dabholkar, has been rejected by the District Sessions Court. Advocates of the defense party have demanded that Vikram Bhave's bail application be approved by the District Sessions Court.


Web Title: The bail application was rejected of vikram Bhave who suspect accused in the Dabholkar murder case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.