शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Bacchu Kadu Hunger Strike: अन्नत्याग आंदोलन स्थगित! बच्चू कडूंना महायुती सरकारने दिली तीन आश्वासने

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 15:24 IST

Bacchu Kadu Uposhan: प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलनासह इतर सर्व आंदोलने स्थगित करण्याची घोषणा केली आहे. सरकारकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर बच्चू कडूंनी निर्णय जाहीर केला.

Bacchu Kadu Andolan: शेतकरी कर्जमाफीसह विविध १७ मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनाची महायुती सरकारने दखल घेत बच्चू कडू यांना लेखी आश्वासन दिले. त्यानंतर बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलन आणि चक्का जाम आंदोलन स्थगित करत असल्याची घोषणा केली. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफी, दिव्यांगांना निधी यासह १७ मागण्यांसाठी ८ जून पासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते. तिवसा तालुक्यातील मोझरीमध्ये हे अन्नत्याग आंदोलन सुरू होते. विरोधी पक्षातील नेत्यांसह विविध संघटनांनी बच्चू कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला होता. 

महायुती सरकारकडून लेखी आश्वासन

राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी (१३ जून) आंदोलन स्थळी जाऊन बच्चू कडू यांची भेट घेतली. या भेटीवेळी त्यांनी बच्चू कडू यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर सरकारच्या वतीने बच्चू कडू यांना लेखी आश्वासन दिले. 

शेतकरी कर्ज माफीसाठी १५ दिवसामधे उच्चस्तरीय समिती नेमली जाईल. समितीचा अहवाल प्राप्त झाल्यावर कर्ज माफी संदर्भात निर्णय घेण्यात येईल तथा थकीत कर्जदाराच्या सक्तीच्या वसुलीला स्थगिती देणे व नवीन कर्ज वाटप करण्यासाठी बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल.

दिव्यांगाच्या मानधन वाढी बाबत ३० जून च्या पुरवणी बजेट मध्ये तरतूद करण्यात येईल.

उर्वरित मुद्यावर संबंधित मंत्री तथा मुख्यमंत्री महोदय यांचे सोबत बैठक घेऊन मागण्या निकाली काढल्या जातील.

अन्नत्याग आणि चक्का जाम आंदोलन स्थगित

सरकारकडून प्रमुख मागण्यांसदर्भात लेखी आश्वासन देण्यात आल्यानंतर बच्चू कडू यांनी चक्का जाम आंदोलन स्थगित करत असल्याची घोषणा केली. 

"सरकारतर्फे लेखी आश्वासनानंतर अन्नत्याग आंदोलन स्थगित केले आहे, याची सर्वांनी नोंद घ्यावी. तसेच उद्या (१५ जून) होणारे चक्का जाम हे देखील स्थगित करण्यात आले आहे", असे बच्चू कडू यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले. 

 

टॅग्स :Bacchu Kaduबच्चू कडूagitationआंदोलनFarmerशेतकरीMahayutiमहायुतीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार