शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Ayodhya Verdict: लोकशाहीच्या मूल्यांना मजबूत करणारा निकाल - देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2019 15:04 IST

Ayodhya Result : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून स्वागत

मुंबई: अयोध्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या ऐतिहासिक निकालाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केलं आहे. न्यायालयाच्या निर्णयामुळे लोकशाहीची मूल्यं आणखी मजबूत होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे वेगळ्या चष्मातून पाहू नका. यामुळे कोणचाही विजय अथवा पराजय नाही, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. अयोध्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं निकाल दिल्यानंतर पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भावना मांडल्या. न्यायालयानं दिलेल्या निकालामुळे लोकशाही मूल्यं अधिक मजबूत होतील. जवळपास सर्वांनीच या निकालाचं उत्साहात स्वागत केलं आहे. मुंबईसह राज्यभरात अतिशय चांगलं वातावरण पाहायला मिळत आहे. याबद्दल मी राज्यातील जनतेचे आभार मानतो. यापुढेही राज्यात शांतता कायम राहील, असा विश्वास वाटतो, असं मुख्यमंत्री म्हणाले. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था कायम राहील आणि येत्या काही दिवसात येऊ घातलेले विविध धर्मांचे सण अतिशय उत्साहात साजरे होतील, अशी आशा फडणवीसांनी व्यक्त केली. 'सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर मोदींनी भारतभक्तीचा उल्लेख केला. भारतभक्तीचा हाच भाव देशात दिसतो आहे. हाच खरा सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आहे. नव्या भारताच्या उभारणीसाठी आपण सगळे एकजुटीनं प्रयत्न करू,' असं आवाहन त्यांनी केलं. संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या अयोध्या प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निकाल सुनावला. अयोध्येतील वादग्रस्त जमीन प्रभू श्रीरामाच्या मंदिरासाठी देण्यात यावी आणि सुन्नी वक्फ बोर्डाला मशिदीसाठी पाच एकर मोक्याची पर्यायी जागा द्यावी, असं सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाने म्हटलं आहे. अयोध्येतील वादग्रस्त जमीन रामलल्लाचीच असल्याचा निर्णय न्यायालयानं दिला. तीन महिन्यात राम मंदिराच्या उभारणीसाठी योजना आखा. एक न्यास स्थापन करुन मंदिर निर्माणाचा आराखडा द्या, अशा सूचना न्यायालयानं दिल्या आहेत.  

टॅग्स :Ayodhyaअयोध्याDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसRam Mandirराम मंदिरSupreme Courtसर्वोच्च न्यायालय