शहरं
Join us  
Trending Stories
1
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
2
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
3
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
4
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
5
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
6
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
7
सत्ता मिळविण्यासाठी उद्धवसेनेने प्रतिष्ठा घालविली; मुख्यमंत्री शिंदेंची घणाघाती टीका
8
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
9
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
10
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
11
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
12
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
13
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
14
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
15
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
16
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती
17
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
18
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
19
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
20
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक

औरंगाबाद: गांधीनगरात तीन जणांना भोसकले, दोघांची प्रकृती गंभीर

By admin | Published: July 17, 2017 5:40 PM

आई-बहिणीवरुन शिवी दिल्याच्या किरकोळ कारणावरुन रविवारी रात्री गांधीनगर येथे एकाच दोन कुटुंबात जोरदार हाणामारी झाली.

ऑनलाइन लोकमतऔरंगाबाद, दि. 17 : आई-बहिणीवरुन शिवी दिल्याच्या किरकोळ कारणावरुन रविवारी रात्री गांधीनगर येथे एकाच दोन कुटुंबात जोरदार हाणामारी झाली. यावेळी एका परिवाराने दुसऱ्यावर तलवार आणि चाकू,लाठ्या, काठ्याने हल्ला केल्याने तीन जण रक्ताच्या थारोळ्यात पडले. यातील दोन जणांची प्रकृती चिंताजनक असून सर्व जखमींवर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहे. याप्रकरणी क्रांतीचौक पोलीस ठाण्यात सात जणांविरूद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलिसांनी पाच जणांना अटक केली.

राहुल उर्फ डुड्डा राममहेर कागडा, राममहेर कागडा, करण उर्फ बब्बल रामपाल कागडा,अजय प्रेम कागडा आणि नरेंद्र राममहेर कागडा अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत तर प्रेम हरिकिशन कागडा आणि मिन्नू उर्फ मनोज हरिकिशन कागडा(सर्व रा. गांधीनगर) हे पसार झाले असून त्यांचा शोध सुरू आहे. तर संदीप मदनलाल कागडा, नितीन कागडा,गणेश चावरिया आणि सोनीया कागडा अशी जखमींची नावे असून संदीप आणि गणेश यांची प्रकृती चिंताजजनक आहे. याविषयी अधिक माहिती देताना सहायक पोलीस आयुक्त गोवर्धन कोळेकर आणि पोलीस निरीक्षक अनिल आडे म्हणाले की, संदीप मदनलाल कागडा(३१,रा. गांधीनगर) हा १६ जुलै रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास गांधीनगर येथील जागृत हनुमान मंदीराजवळील ओट्यावर बसलेला होता. यावेळी त्याच्याशेजारी काही अंतरावर असलेल्या आरोपी राहुल उर्फ डुड्डा कागडा हा संदीपचे नाव घेऊन त्यास आई -बहिणीवरुन शिव्या देऊ लागला. त्याचा संदीपला राग आल्याने त्यांनी मोठ्या आवाजात शिव्या देऊ नको,असे दरडावून सांगितले. यामुळे त्यांच्यात वाद सुरू झाला.

संबंधित बातम्या 
 
दहीहंडी सरावाचा गुरुपौर्णिमेचा मुहूर्त कोर्टाच्या दाव्याने हुकला 
दहीहंडीला क्रीडा प्रकार घोषित करा
सेलिब्रिटी दहीहंडीवर बहिष्कार टाका

हा वाद सुरू असतानाच राहुलचे वडिल राममहेर हे घरातून धारदार तलवार घेऊन आला आणि त्यांनी मागूनच संदीपच्या पोटात तलवार खुपसली. ही तलवार संदीपच्या पोटाच्या डाव्या बाजूने आरपार घुसली.यावेळी संदीपच्या आवाजाने त्याचा भाऊ नितीन,मामा गणेश चावरिया आणि पत्नी सोनिया कागडा तेथे आले. यावेळी तेथे उभा असलेल्या राहुलने गणेश चावरिया यांच्या पोटावर धारदार चाकूने वार केला. हा वार एवढा भिषण होता की, गणेश यांच्या पोटातील सर्व आतडी बाहेर पडल्या आणि ते जमिनीवर कोसळले. यावेळी आरोपी मिन्नू उर्फ मनोजने रॉड नितीच्या डोक्यात मारून त्यास जखमी केले. तर आरोपी करण उर्फ बब्बलने,आरोपी अजय, नरेंद्र कागडायाने दांड्याने सोनियासह सर्वांनाना पुन्हा मारले. तर आरोपी प्रेम कागडाने दगडाने वर्षाव केला.