औरंगाबाद: भरधाव बसने दुचाकीस्वार महिलेला चिरडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2018 13:04 IST2018-03-04T13:04:32+5:302018-03-04T13:04:43+5:30
कामगारांची वाहतूक करणा-या भरधाव बसने दुचाकीस्वार दाम्पत्याला उडवले.

औरंगाबाद: भरधाव बसने दुचाकीस्वार महिलेला चिरडले
औरंगाबाद : कामगारांची वाहतूक करणा-या भरधाव बसने दुचाकीस्वार दाम्पत्याला उडवले. या अपघातात दुचाकीस्वार महिला जागीच ठार झाली तर महिलेचा पती जखमी झाला असून त्यास घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. हा भीषण अपघात ४ मार्च रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास वाळूज एमआयडीसीमधील बजाज विहारसमोर घडला.
सविता समाधान सोन्ने(३२,रा. जयभवानी चौक,बजाजनगर)असे मृत महिलेचे नाव आहे. तर समाधान सोन्ने हे जखमी झाले. याविषयी अधिक माहिती अशी की, सविता आणि समाधान यांच्या नातेवाईकाच्या विवाह समारंभ असल्याने ते आज सकाळी बजाजनगर येथून औरंगाबाद शहराकडे दुचाकीने येत होते. वाळूज एमआयडीसीमधील बजाज विहार समोर ते असताना मागून आलेल्या कामगारांच्या बसने त्यांना उडवले. या अपघातात सविता बसच्या चाकाखाली आल्याने जागीच ठार झाल्या तर त्यांचा पतीही या घटनेत जखमी झाला. अपघातानंतर त्यांना तात्काळ घाटीत हलविण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी वाळूज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी पोलिसांनी बसचालकाविरोधात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.