सोहळ्याला उद्योगपती, सेलिब्रिटींची उपस्थिती; आझाद मैदान झाले भगवे अन् गुलाबी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 09:31 IST2024-12-06T09:30:31+5:302024-12-06T09:31:31+5:30

शपथविधी सोहळ्याला अनेक उद्योगपती आणि सेलिब्रेटींनी हजेरी लावली होती.

Attendance of industrialists, celebrities at the ceremony; Azad Maidan became saffron and pink | सोहळ्याला उद्योगपती, सेलिब्रिटींची उपस्थिती; आझाद मैदान झाले भगवे अन् गुलाबी

सोहळ्याला उद्योगपती, सेलिब्रिटींची उपस्थिती; आझाद मैदान झाले भगवे अन् गुलाबी

मुंबई : शपथविधी सोहळ्याला अनेक उद्योगपती आणि सेलिब्रेटींनी हजेरी लावली होती. मंडपामध्ये महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य कटआउट्स लक्ष वेधून घेत होते, तर सोहळ्यासाठी येणाऱ्या कार्यकर्त्यांनी गुलाबी फेटे, भगव्या शाली, गमछे, असा पेहराव केला होता. ‘जय श्रीराम’च्या घोषणांनी आझाद मैदान दुमदुमून गेले होते.

 राजकीय क्षेत्राव्यतिरिक्त उद्योग, चित्रपट आणि क्रीडा जगतातील अनेक मान्यवरही या सोहळ्याला उपस्थित होते. उद्योगपती मुकेश अंबानी, नीता अंबानी, अनंत अंबानी, राधिका अंबानी, गौतम अदानी, प्रणय अदानी, नोएल टाटा, दीपक पारीख, कुमार मंगलम बिर्ला, अजय पिरामल, उदय कोटक, गीतांजली किर्लोस्कर, मानसी किर्लोस्कर हे या सोहळ्याला उपस्थित होते.  बॉलिवूडमधील अनेकांची हजेरीही शपथविधी सोहळ्याचे आकर्षण ठरले होते.  भारतरत्न आणि माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर पत्नी अंजलीसह, तर अभिनेत्री माधुरी दीक्षित पती डॉक्टर नेने यांच्यासह उपस्थित होती. शाहरुख खान, सलमान खान, विकी कौशल, खुशी कपूर, रूपा गांगुली, सिद्धार्थ रॉय, रणबीर कपूर, रणवीर सिंग, तमन्ना भाटिया, सुबोध भावे, अर्जुन कपूर आदी या सोहळ्याला हजर होते. चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी, बोनी कपूर, एकता कपूर, श्रद्धा कपूर, जय कोटेक, विक्रांत मॅसी आणि जयेश शाह हेदेखील या सोहळ्याला उपस्थित होते.

व्यासपीठावर या मान्यवरांची उपस्थिती

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, भाजपचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा, राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे, केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल, केंद्रीय परराष्ट्रमंत्री डॉ. सुब्रमण्यम जयशंकर, केंद्रीय पर्यावरणमंत्री भूपेंद्र यादव, केंद्रीय माहिती तंत्रज्ञानमंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान, सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योग मंत्री जितेन राम मांझी, केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री ललन सिंग, केंद्रीय दूरसंचारमंत्री ज्योतिरादित्य शिंदे, केंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरण रिज्जूजी, केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योगमंत्री चिराग पासवान, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहळ, प्रतापराव जाधव, रक्षा खडसे, तसेच भाजपचे नेते विनोद तावडे, अजित पवार गटाचे नेते खा. प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, जनसुराज्य पक्षाचे विनय कोरे, भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार आदींची उपस्थिती होती.

सोहळ्यास हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री होते उपस्थित

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिश्व शर्मा, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव, छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देवसाय, राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, हरियाणाचे मुख्यमंत्री नायबसिंह चैनी, ओरिसाचे मुख्यमंत्री मोहन मांझी, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी, पुड्डुचेरीचे मुख्यमंत्री एन. रंगस्वामी, अरुणाचलचे मुख्यमंत्री पेमा खांडू, मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह, मेघालयाचे मुख्यमंत्री कॉनराड संगमा, नागालॅण्डचे मुख्यमंत्री नेफिउ रिओ, सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेमसिंग तमन्न, त्रिपुराचे मुख्यमंत्री मानिक सहा, उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य, ब्रजेश पाठक, आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण, मध्य प्रदेशचे उपमुख्यमंत्री राजेंद्र शुक्ला, छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री अरुण साव, विजय शर्मा, राजस्थानचे उपमुख्यमंत्री प्रेमचंद बेरवा, दिया कुमारी, बिहारचे उपमुख्यमंत्री विजय सिन्हा, सम्राट चौधरी, ओरिसाचे उपमुख्यमंत्री कनक वर्धन देव, प्रवती परिता, अरुणाचलचे उपमुख्यमंत्री चौना मीन, मेघालयचे उपमुख्यमंत्री प्रेस्टटोपीन सॉन, नागालॅण्डचे उपमुख्यमंत्री यान तुंगो पातन, टी. आर. झेलयान, मेघालयचे उपमुख्यमंत्री स्निया बलंदर आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपानी.

Web Title: Attendance of industrialists, celebrities at the ceremony; Azad Maidan became saffron and pink

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.