शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

दूधकोंडीचा फास आवळण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2018 05:46 IST

दूध आंदोलनासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले असून, अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांनी दूध फेकून दिले. पुण्यात हडपसरमध्ये दुधाच्या टेम्पोची तोडफोड केल्याप्रकरणी पोलिसांनी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रकाश पोफले, राज्य प्रवक्ते अनिल पवार, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष अमोल हिपरंगे यांना ताब्यात घेतले.

पुणे/कोल्हापूर : दूध आंदोलनासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले असून, अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांनी दूध फेकून दिले. पुण्यात हडपसरमध्ये दुधाच्या टेम्पोची तोडफोड केल्याप्रकरणी पोलिसांनी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रकाश पोफले, राज्य प्रवक्ते अनिल पवार, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष अमोल हिपरंगे यांना ताब्यात घेतले.पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाकडे (कात्रज दूध) दूध संकलन होऊ नये, याची काळजी कार्यकर्ते घेत आहेत. त्यामुळे कात्रजचे दूध संकलन मंगळवारी निम्म्याने घटले. राज्यातील विविध खासगी डेअऱ्यांमध्येदेखील निम्मेही संकलन होऊ शकले नाही.दूधसंघांशी चर्चा करणारनागपूरमध्ये मंगळवारच्या बैठकीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, राष्टÑवादीचे नेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ज्येष्ठ सदस्य गणपतराव देशमुख यांच्यासह दुग्धविकास मंत्री महादेव जानकर उपस्थित होते. ‘लोकमत’शी बोलताना जयंत पाटील म्हणाले, राज्यातील प्रमुख दूधसंघ प्रतिनिधी, सहकारी दूधसंघ प्रतिनिधी यांना बोलावून त्यांच्याशी चर्चा करावी, असेही ठरले आहे. ते गुरुवारी येतील. त्यावर पुन्हा चर्चा होऊन निर्णय घेतले जातील, असे त्यांनी सांगितले.मुंबईकरांच्या दूधासाठी रेल्वे सज्ज !मुंबई : राज्यात सुरु असलेली दूधकोंडी फोडण्यासाठी सरकारने रेल्वेमार्फत गुजरात येथील दूध मुंबईला आणण्याच्या सूचना केल्या होत्या. यानूसार अहमदाबाद-मुंबई सेंट्रल पॅसेंजरच्या एका फेरीत तब्बल ८८ हजार लिटर दूध मुंबईत दाखल झालें़ रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी पश्चिम रेल्वेला गुजरात येथील दूध मुंबईत नेण्याबाबत सूचना केली.

टॅग्स :milkदूध