शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

एटीएसला हवा सचिन वाझेचा ताबा; ३० मार्चला याचिकेवर हाेणार सुनावणी,  वाझे कुटुंबीयांना संरक्षण देण्याची मागणी मान्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2021 06:53 IST

वाझेंच्या कुटुंबीयांना संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी त्यांच्या वकिलांनी ठाणे न्यायालयात केली हाेती. ती अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एस. तांबे यांनी मान्य केली.

ठाणे : ठाण्यातील व्यापारी मनसुख हिरेन यांच्या कथित हत्येप्रकरणी दहशतवादविरोधी पथकाने आतापर्यंत केलेल्या तपासाबाबतचा चार पानांचा अहवाल शुक्रवारी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एस. तांबे यांच्या न्यायालयात सादर केला. या अहवालात वाझेंच्या अटकपूर्व जामीन अर्जाला विरोध करतानाच, या प्रकरणात पुरावे गोळा करण्याचे काम सुरू असल्याचे एटीएसने म्हटले आहे. मुंबईचे निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे सध्या एनआयएच्या ताब्यात असून, त्यांचा ताबा एटीएसला मिळावा, यासाठी अर्जाची सुनावणी ३० मार्चपर्यंत तहकूब करण्यात आली. (ATS wants control of Sachin Vaze; Hearing on the petition to be held on March 30, the demand for protection to the Waze family was accepted)    दरम्यान, वाझेंच्या कुटुंबीयांना संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी त्यांच्या वकिलांनी ठाणे न्यायालयात केली हाेती. ती अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एस. तांबे यांनी मान्य केली.सध्या मुंबईतील ‘अँटालिया’ इमारतीजवळ जिलेटिनच्या कांड्या असलेली स्कॉर्पिओ मोटार मिळाल्याच्या घटनेबाबत वाझेंना राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) ने अटक केली आहे. त्याआधी त्यांनी ठाणे न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी केलेल्या अर्जाची सुनावणी आज (शुक्रवारी) होणार होती. मात्र, त्याआधीच त्यांना एनआयएने अटक केली. दरम्यान, मनसुख हिरेन यांच्या कथित हत्येप्रकरणी राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस)आपले म्हणणे न्यायालयात सादर करावे, असे आदेश ठाणे न्यायालयाने दिले होते. त्यामुळे हिरेन यांच्या कुटुंबीयांनी वाझेंवर केलेले आरोप व एटीएसने हिरेन यांच्या कथित हत्या प्रकरणात आतापर्यंत केलेला तपास यासंदर्भात चार पानी अहवाल ठाणे न्यायालयात सादर केला. या अहवालातून बऱ्ययाच बाबी समाेर येतील, असे सांगण्यात येत आहे. एटीएसने हिरेन यांच्या कथित हत्या प्रकरणात आतापर्यंत गोळा केलेले पुरावे, संबंधितांचे नोंदविलेले जाबजबाब याआधारे वाझेंना अटकपूर्व जामीन देण्यास विरोध केला. या प्रकरणाचा तपास करून निष्कर्षाप्रत येण्याकरिता वाझेंचा ताबा एटीएसला हवा आहे. दरम्यान, साकेत सोसायटीमध्ये राहणाऱ्या वाझे कुटुंबीयांना संरक्षण देण्यात यावे, प्रसारमाध्यमांकडूनही त्यांना कोणत्याही प्रकारे त्रास होऊ नये, अशी मागणी वाझेंच्या बहिणीने केली. त्यावर वाझे कुटुंबीयांना संरक्षण देण्याचे आदेश न्यायालयाने ठाणे पोलिसांना दिले.यासाेबतच अटकपूर्व जामीन अर्जावरील पुढील सुनावणी तहकूब करण्यात आल्यामुळे आता ही सुनावणी  ३० मार्च रोजी होणार आहे. जिल्हा सरकारी वकील हेमंत लोंढे यांनी एटीएसच्या बाजूने न्यायालयात तपास अहवाल सादर केला.

सचिन वाझेंच्या कुटुंबीयांना पोलीस संरक्षण देण्याबाबत ठाणे न्यायालयाचे आदेश अद्याप मिळालेले नाहीत. ते मिळाले की त्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.’- अविनाश अंबुरे, पोलीस उपायुक्त, ठाणे शहर 

टॅग्स :sachin Vazeसचिन वाझेNIAराष्ट्रीय तपास यंत्रणाPoliceपोलिसMukesh Ambaniमुकेश अंबानीMansukh Hirenमनसुख हिरणMumbaiमुंबईCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालय