तेव्हा संजय राऊतांची सिंधुदुर्गमध्ये येण्याची हिंमतही नव्हती; केसरकरांचे प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2023 16:11 IST2023-10-10T16:10:31+5:302023-10-10T16:11:01+5:30
केसरकर हे सावंतवाडीच्या मोती तलावातला डोमकावळा असल्याची टीका आज ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केली होती.

तेव्हा संजय राऊतांची सिंधुदुर्गमध्ये येण्याची हिंमतही नव्हती; केसरकरांचे प्रत्युत्तर
केसरकर हे सावंतवाडीच्या मोती तलावातला डोमकावळा असल्याची टीका आज ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी राज्याचे मंत्री दीपक केसरकर यांच्यावर केली होती. यावर केसरकर यांनी प्रत्यूत्तर दिले आहे.
मी कोकणामध्ये वैचारिक संघर्ष केला, वैचारिक भूमिकेतून मी राष्ट्रवादीचा राजीनामा दिला होता, असे केसरकर यांनी स्पष्ट केले. वैचारिक संघर्ष संजय राऊतांच्या आसपासची गोष्ट नाहीय, असा टोलाही केसरकरांनी हाणला.
केसरकर यांच्या शिवसेनेत येण्याला आमचा विरोध होता. हा माणूस सत्तेसाठी पाठीत खंजीर खुपसून निघून जाईल, असे आम्हाला वाटत होते. आता हे शिंदेंच्याही पाठीत खंजीर खुपसून भाजपात निघून जातील, याची आम्हाला खात्री आहे, अशी टीका राऊत यांनी केली होती. यावर केसरकर यांनी हे उत्तर दिले आहे.
याचबरोबर नारायण राणे आणि माझे अतिशय चांगले संबंध आहेत. तेव्हा संजय राऊतांची सिंधुदुर्गमध्ये येण्याची हिंमतही नव्हती, असे केसरकर म्हणाले आहेत.