शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

"पहिल्या नजरेत गडबड दिसतेय"; अक्षय शिंदे एन्काउंटरवर उच्च न्यायालयाने पोलिसांकडे केल्या या मागण्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2024 13:58 IST

Akshay Shinde encounter Court Hearing: अक्षय शिंदे याच्या एन्काउंटरवरून अक्षय शिंदेचे वडील अण्णा शिंदे हे मुंबई उच्च न्यायालयात गेले आहेत. यावर तातडीची सुनावणी सुरु झाली आहे.

बदलापूर शाळेतील अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या एन्काउंटरवरून अक्षय शिंदेचे वडील अण्णा शिंदे हे मुंबई उच्च न्यायालयात गेले आहेत. शिंदे यांनी तातडीने फौजदारी रिट याचिका दाखल केली असून यावर तातडीने आज सुनावणी घेण्यात आली आहे. यामध्ये उच्च न्यायालयाने पहिल्या नजरेतच गडबड दिसतेय, अशी टिप्पणी केली आहे. 

अण्णा शिंदे यांच्याकडून वकील अमित कटारनवरे काम पाहत आहेत. यावेळी न्यायालयात शिंदे यांच्याकडून विधानसभा निवडणूक असल्याने त्याचा राजकीय फायदा घेतला जात असल्याचा संशय व्यक्त केला आहे.  मोठ्या व्यक्तीला वाचवण्यासासाठी माझ्या मुलाचा निर्घृण खून करण्यात आल्याचा आरोप त्यांनी वकिलामार्फत केला आहे. माझ्या मुलाची पिस्तुल हिसकावण्याची हिंमत नाही, असेही ते म्हणाले आहेत. 

याचबरोबर या संपूर्ण प्रकरणाची उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली एसआयटी स्थापन करून चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. देवाभाऊचा न्याय, मुख्यमंत्र्यांचा न्याय असे मेसेज सोशल मीडिया, बॅनरद्वारे फिरू लागले आहेत. मग न्यायव्यवस्थेची गरजच काय असा सवाल याचिकाकर्त्या शिंदेंनी केला आहे. 

न्यायालयाने काय म्हटले...

न्यायमूर्ती चव्हाण यांच्या बेंचसमोर ही सुनावणी सुरु आहे. यावेळी न्यायालयाने या प्रकरणावर प्रश्न उपस्थित केले आहेत. मागे चार पोलीस होते, मग एका दुबळ्या व्यक्तीला ते ताब्यात ठेऊ शकले नाहीत हे कसे शक्य आहे. ते देखील गाडीच्या मागील भागात आरोपीच्या बाजुला दोन आणि पुढे दोन पोलीस होते. पिस्तुलवर हाताचे ठसे असायला हवेत आणि हात धुतलेला असायला हवा. पुढच्या तारखेला सर्वकाही सादर करा, असे न्यायालयाने म्हटले.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार शिंदे याने तीन गोळ्या झाडल्या. पण एकच गोळी लागली. उरलेल्या दोन गोळ्या कुठे गेल्या? त्याने केलेला गोळीबार थेट पोलिसांवर होता की इकडे तिकडे केलेला, पोलिसाला कोणती दुखापत झाली आहे, छेद देऊन जाणारी की स्पर्श करून जाणारी, असा सवाल न्यायामूर्तींनी पोलिसांना केला आहे.  

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयMumbai High Courtमुंबई हायकोर्टbadlapurबदलापूरCrime Newsगुन्हेगारी