शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
4
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
5
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
6
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
7
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
8
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
9
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
10
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
11
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
12
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
13
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
14
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
15
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
16
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
17
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
18
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
19
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
20
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!

‘लोकसभेसोबतच राज्यात विधानसभेची निवडणूक’ - अशोक चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2019 05:12 IST

‘लोकसभा व विधानसभा निवडणुका एकत्रित घेण्याची तयारी सुरू आहे. २८ फेब्रुवारी रोजी विधानसभेचे अधिवेशन संपताच मुख्यमंत्री विधानसभा बरखास्त करतील

औरंगाबाद : ‘लोकसभा व विधानसभा निवडणुका एकत्रित घेण्याची तयारी सुरू आहे. २८ फेब्रुवारी रोजी विधानसभेचे अधिवेशन संपताच मुख्यमंत्री विधानसभा बरखास्त करतील आणि लोकसभेसोबतच विधानसभेच्या निवडणुकादेखील घेतल्या जातील, त्यादृष्टीने कामाला लागा. मतांचे विभाजन टाळा आणि भाजप- सेनेला पाडा,’ असे कळकळीचे आवाहन प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केले.राजीव गांधी स्टेडयमवर गुरुवारी आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. चव्हाण यांनी यावेळी केंद्र व राज्य सरकारवर चौफेर टीका केली. अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांना उद्देशून ते म्हणाले की, ‘वंचित बहुजन आघाडीला माझी हात जोडून विनंती आहे की, भाजपला मदत होईल, असे काही करू नका. केवळ ३० टक्के मतांवर भाजपचे सरकार आलेले आहे. उर्वरित ७० टक्के मते आता एकसंध राहिली पाहिजेत.मतांचे विभाजन टाळावे यासाठीच मी स्वत: प्रकाश आंबेडकर यांच्या घरी एकदा नव्हे, तर पाच वेळा गेलो. तशी जागावाटपाचीही फार मोठी गोष्ट नाही. स्वत: प्रकाश आंबेडकर हे खासदार बनावेत, ही आम्हा सर्वांची इच्छा आहे. पत्रकारांशी बोलताना चव्हाण म्हणाले, काँग्रेस आरएसएसच्या विरोधात काल होता, आज आहे आणि उद्याही राहील. महात्मा गांधी यांच्या काळापासून काँग्रेसची आरएसएसविरोधी भूमिका स्पष्टपणे राहत आली आहे. त्यामुळे काँग्रेसची आरएसएसच्या संदर्भात लेचीपेची भूमिका असण्याचे कारणच नाही. उलट प्रकाश आंबेडकर यांच्यासह आरएसएसविरोधी सर्व शक्तींनी एकत्र येत लढा उभा करण्याची गरज आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या निरोपाची वाट पाहत आहोत. त्यांचा निरोप येत नसल्याने काँग्रेस- राष्टÑवादीचे उमेदवार जाहीर करावयाचे थांबले आहे, असेही त्यांनी सांगितले.घोषवाक्याला उस्फुर्त प्रतिसादअबकी बार बस कर यार, अबकी बार काँग्रेस सरकार, अबकी बार आपटी मार, असे घोषवाक्य अशोकराव चव्हाण सादर करीत होते, तेव्हा त्यांना चांगला प्रतिसाद मिळत होता. लोकांना पाहिजेत चारा छावण्या आणि यांनी सुरू केल्या डान्सबार लावण्या या त्यांच्या वाक्याला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली. मराठा आरक्षण ही काही सरकारची मेहरबानी नाही. त्यासाठी सकल मराठा समाजाला दबाव निर्माण करावा लागला. ५८ मोर्चे काढावे लागले; पण लागू झाले का मराठा आरक्षण? असा सवालही त्यांनी केला.

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणMaharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारण