शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan Sabha 2019 : ...तर वंचितसोबत पुन्हा आघाडी शक्य; एमआयएमचा सूर बदलला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2019 18:23 IST

: जागावाटपात तडजोड झाल्यास एमआयएम आघाडी करण्यास तयार

मुंबई: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम यांची आघाडी होण्याची शक्यता आहे. जागांची तडजोड केल्यास आघाडी होऊ शकते, असं विधान एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केलं आहे. माझ्या हातून काही चूक झाली असेल, तर त्यासाठी मी प्रकाश आंबेडकर यांची माफी मागायला तयार असल्याचंदेखील ते म्हणाले. त्यामुळे लोकसभेपाठोपाठ विधानसभा निवडणुकीतही वंचित आणि एमआयएमची आघाडी होऊ शकते.जागावाटपात सन्मान राखला जात नसल्यानं आघाडीमधून बाहेर पडत असल्याची घोषणा काही दिवसांपूर्वी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केली होती. यानंतर जलील आणि वंचित बहुजन आघाडीत वाकयुद्ध रंगलं होतं. मात्र आता हा वाद संपुष्टात येण्याची चिन्हं आहेत. जागावाटपात तडजोड झाल्यास आघाडी शक्य असल्याचं जलील यांनी म्हटलं आहे.  एमआयएमला सन्मानजनक जागा मिळाल्यास वंचितसोबत आघाडी होईल, असं म्हणत त्यांनी मनोमिलनाचे संकेत दिले.प्रकाश आंबेडकर आमचे मोठे बंधू आहेत. त्यांनी एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांना फोन करुन संवाद साधावा, असं म्हणत जलील यांनी आंबेडकरांची माफी मागण्याचीदेखील तयारी दर्शवली. माझ्याकडून काय चूक झाली याची मला कल्पना नाही. मात्र अनावधानानं माझ्या हातून काही चुकीचं घडलं असेल, तर त्यासाठी मी आंबेडकरांची क्षमा मागण्यास तयार आहे. कारण मी त्यांचा आदर करतो, असंदेखील जलील म्हणाले.जलील यांनी आघाडी मोडल्याची घोषणा केल्यानंतर वंचितच्या नेत्यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यामुळे जलील आणि वंचित यांच्यात वाद पेटला होता. या वादावर भाष्य करताना आंबेडकर यांनी आम्ही थेट ओवेसींशी बोलतो, असं म्हणत जलील यांना अनुल्लेखानं मारलं होतं. विशेष म्हणजे यावर ओवेसी यांनी जलील यांचाच शब्द महाराष्ट्रात अंतिम असेल, असं म्हणत आघाडी मोडल्याच्या वृत्तावर शिक्कामोर्तब केलं होतं.  

टॅग्स :Vanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीBharip Bahujan Mahasanghभारिप बहुजन महासंघAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीImtiaz Jalilइम्तियाज जलील