शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

संजय राठाेड यांचे मनपरिवर्तन करा; उद्धव ठाकरे यांनी साधला महतांशी संपर्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2022 17:05 IST

नागपूर संपर्क प्रमुखासह अमरावती जिल्हाप्रमुख पाेहरादेवीत!

वाशिम : एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडामध्ये दिग्रस-दारव्हा-नेर मतदारसंघाचे आमदार संजय राठाेड यांचा समावेश आहे. संजय राठाेड यांचे मनपरिवर्तन करण्यासाठी पाेहरादेवी येथील महंतांची भेट घेण्यासंदर्भात उध्दव ठाकरे यांनी नागपूर संपर्कप्रमुखासह काही जिल्हा प्रमुखांना पाेहरादेवी येथे जाण्याच्या सूचना दिल्या हाेत्या. त्यावरुन २९ जून राेजी दुपारी ३.३० वाजता मान्यवरांनी महंत यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी खुद्द मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी भ्रमणध्वनीवर त्यांच्याशी संपर्क साधला.

२९ जून राेजी दुपारी ३.३० वाजताच्या दरम्यान नागपूरचे शिवसेना संपर्क प्रमुख सुधीर सुर्यवंशी यांच्यासाेबत  अमरावती जिल्हा प्रमुख श्याम देशमुख, राजेश वानखडे, सुधीर खराटे यांनी पाेहरादेवी येथे जाऊन महंत सुनील महाराज यांची भेट घेतली. यावेळी आमदार संजय राठाेड यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करावा अशी विणवणी केली. यावेळी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सुनील महाराज यांना संजय राठाेड यांना समजावून सांगण्याचे भ्रमणध्वनीवर भावनिक आवाहन केले.  सुनील महाराज यांनी ठाकरे यांना आम्ही सर्व जण बसून या विषयावर त्यांच्याशी चर्चा करण्याचे आश्वासन दिले. तसेच ज्या पक्षाने आपल्याला माेठे केले त्यांच्यासाेबत असे न करण्याचे सांगताेय असा शब्द महंत सुनील महाराज यांनी ठाकरे यांना दिला. यावेळी आलेले शिष्टमंडळ पाेहरादेवी येथील  बंजारा धर्मगुरु बाबुसिंग महाराज, देवी सेवालाल ट्रस्टचे अध्यक्ष कबिरदास महाराज, जितेंद्र महाराज, शेखर महाराज यांची भेट घेणार आहेत.

१९ जून राेजी उध्दव ठाकरे यांनी महंतांना बाेलावून संजय राठाेड यांना मंत्रीपद देण्याबाबत चर्चा केली हाेती. त्यानंतरही संजय राठाेड यांनी बंडात सहभाग घेतला. त्यांना महतांनी समजावून सांगावे याकरिता मी व माझ्यासाेबत काही जिल्हाप्रमुखासह मी पाेहरादेवी येथे आलाे असून सकारात्मक चर्चा हाेत आहे.- सुधीर सुर्यवंशीशिवसेना, नागपूर संपर्क प्रमुख

टॅग्स :Sanjay Rathodसंजय राठोडUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदे