भाऊबंदकी चव्हाट्यावर; राधाकृष्ण विखेंच्या विरोधात अशोक विखे करणार उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 13:51 IST2019-05-14T13:47:25+5:302019-05-14T13:51:42+5:30
राधाकृष्ण विखेंच्या संस्थांची चौकशी करण्याची मागणी

भाऊबंदकी चव्हाट्यावर; राधाकृष्ण विखेंच्या विरोधात अशोक विखे करणार उपोषण
अहमदनगर: काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्याविरोधात त्यांचे मोठे बंधू डॉ. अशोक विखे पाटील उपोषण करणार आहेत. विखे-पाटील कुटुंबाच्या विविध संस्थांची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. यासाठी ते 20 मेपासून लोणी प्रवरानगर इथल्या पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या पुतळ्यासमोर उपोषणाला बसणार आहेत.
अशोक विखे पाटील यांनी त्यांच्या उपोषणासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं आहे. प्रवरानगर, गणेश, राहुरी या कारखान्यांनी जाहीर केल्याप्रमाणे शेतकऱ्यांना उसाचे पैसे मिळावेत, झाकीर नाईकच्या इस्लामिक रिसर्च फाउंडेशननं प्रवरा मेडिकल ट्रस्टला दिलेल्या देणग्यांची चौकशी करावी, जिल्हा परिषदेतील अनुकंपा भरतीतील गैरप्रकाराच्या तपासणी समितीचा अहवाल जाहीर करून संबंधितांवर कारवाई करावी, मुळा-प्रवरा वीज वापर संस्थेतील अपहाराची चौकशी करावी या मागण्यांसाठी अशोक विखे उपोषण करणार आहेत.