खरातशी भेट कशी झाली, एकनाथ शिंदेंना त्या मंदिराची वाट कुणी दाखवली? केसरकरांचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 21:27 IST2026-03-28T21:26:50+5:302026-03-28T21:27:29+5:30

Ashok Kharat Case: आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधत दीपक केसरकर यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच खरातशी आलेल्या संबंधांबाबतही खुलासा केला आहे.

Ashok Kharat Case: How did you meet Ashok Kharat, who showed Eknath Shinde the way to that temple? Deepak Kesarkar's big revelation, said... | खरातशी भेट कशी झाली, एकनाथ शिंदेंना त्या मंदिराची वाट कुणी दाखवली? केसरकरांचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले...

खरातशी भेट कशी झाली, एकनाथ शिंदेंना त्या मंदिराची वाट कुणी दाखवली? केसरकरांचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले...

अनेक महिलांचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप असलेला भोंदू ज्योतिषी अशोक खरात याच्यासोबतचे फोटो समोर आल्याने राज्यातील अनेक बडे नेत अडचणीत आले आहेत. या नेत्यांमध्ये शिंदेसेनेचे ज्येष्ठ नेते दीपक केसरकर यांचाही समावेश आहे. तसेच दीपक केसरकर यांचे अशोक खरात याच्यासोबतचे फोटो समोर आल्यापासून त्यांच्याविरोधात उद्धवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. त्या पार्श्वभूमीवर आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधत दीपक केसरकर यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच खरातशी आलेल्या संबंधांबाबतही खुलासा केला आहे.

आपल्यावरील आरोप फेटाळून लावताना दीपक केसरकर म्हणाले की, अनेक आमदार, अनेक मंत्री हे अशोक खरातला भेटले आहेत. तसेच अनेकांसोबतचे त्याचे फोटो प्रसिद्ध झाले आहेत. परंतु ओळख असणं म्हणजे त्यांच्या कृत्यांमध्ये सहभागी असणं, असं अजिबात नाही. अशोक खरातला वाचवण्यासाठी मी कुठल्याही पोलीस  ठाण्यामध्ये फोन केलेला नाही. तसेच कुठल्याही महिलेची मी त्याच्याशी भेट घालून दिलेली नाही. तसेच कुठल्याही महिलेसोबत त्याने असं घृणास्पद कृत्य त्याने केलं असावं, याची कोणतीही माहिती मला नाही. मात्र केवळ राजकीय द्वेषापोटी या प्रकरणाशी माझा संबंध जोडला जात आहे. तसेच त्यामध्ये उद्धवसेनेचे नेते आघाडीवर आहेत, अशी टीका दीपक केसरकर यांनी केली.

तसेच अशोक खरात याच्यासोबतचे फोटो आणि मंदिरातील भेटीबाबत केसरकर म्हणाले की, मी फक्त शिंदेसाहेबांसोबत त्या मंदिरामध्ये गेलो होतो. तसेच एकाही आमदाराला मी तिथे नेलेलं नाही. तसेच खरातसोबतचे जे फोटो प्रसिद्ध झाले आहेत. त्यातील एकही फोटो हा माझ्या ऑफिसमधील नाही. तर सिन्नर येथे एका को ऑपरेटिव्ह सोसायटीच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्यानिमित्त मी गेलो होतो. तिथे काढलेला तो फोटो आहे.

दरम्यान, अशोक खरातच्या मंदिराची वाट एकनाथ शिंदे यांना कुणी दाखवली असा प्रश्न विचारला असता दीपक केसरकर म्हणाले की, एकनाथ शिंदे यांनी सुद्धा त्या मंदिराबाबत ऐकलं होतं. शिर्डीला एक कार्यक्रम होता आणि शिर्डीपासून अवघ्या १० किमी अंतरावर हे मंदिर आहे. त्यामुळे मी आणि एकनाथ शिंदे हे त्या मंदिरात गेलो. तिथे एकनाथ शिंदे यांनी शिवशंकराची पूजा केली. अन्य कुठलाही विधी केला नाही, असे दीपक केसरकर यांनी सांगितले. 

Web Title : दीपक केसरकर ने अशोक खरात से संबंधों पर सफाई दी, शिंदे के मंदिर दौरे का खुलासा किया।

Web Summary : दीपक केसरकर ने अशोक खरात के कथित अपराधों में शामिल होने से इनकार किया, कहा कि कई नेता उनसे मिले। उन्होंने स्पष्ट किया कि एकनाथ शिंदे ने इसके बारे में सुनने के बाद शिरडी के पास मंदिर का दौरा किया, और केसरकर उनके साथ थे। उन्होंने खरात को बढ़ावा देने या किसी भी गलत काम की सुविधा देने के दावों का खंडन किया।

Web Title : Deepak Kesarkar clarifies relationship with Ashok Kharat, reveals Shinde's temple visit.

Web Summary : Deepak Kesarkar denies involvement with Ashok Kharat's alleged crimes, stating many leaders met him. He clarified that Eknath Shinde visited the temple near Shirdi after hearing about it, and Kesarkar accompanied him. He refuted claims of promoting Kharat or facilitating any wrongdoing.