शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

आषाढी एकादशी : अनर्थ टळला ! पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या चार व्यक्तींना कोरोनाची लागण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2020 18:14 IST

जिल्हा प्रशासनाने पालख्या घेऊन जाणाऱ्या 80 लोकांची कोरोना चाचणी केल्याने मोठा धोका टळला..

ठळक मुद्दे चार संताच्या पादुका मंगळवारी पुणे जिल्ह्यातून एसटीतून पंढरपूरकडे प्रस्थान करणार

पुणे : आषाढीवारी निमित्त पुणे जिल्ह्यातून श्री संत ज्ञानेश्वर महाराज, जगदगुरू श्री संत तुकाराम महाराज, श्री संत सोपानदेव आणि श्री चांगावटेश्वर महाराज यांच्या पालखी प्रस्थान सोहळ्यात सहभागी होणाऱ्या 80 व्यक्तींची जिल्हा प्रशासनाच्या वतीने कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये 4 व्यक्तींच्या चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले. यामुळे या चार व्यक्तींना आता पालखी प्रस्थान सोहळ्यात सहभागी होता येणार नाही. विश्वस्तांकडून कळविण्यात आलेल्या यादीमध्ये या व्यक्तींचा समावेश होता. प्रशासनाच्या वतीने खबरदारी म्हणून पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या व्यक्तींची कोरोना चाचणी करून घेतल्याने मोठा अनर्थ टळला आहे.

आषाढीवारी निमित्त श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या आळंदी येथून, जगदगुरू श्री संत तुकाराम महाराज यांची देहू येथून , श्री संत सोपानदेव यांची जेजूरी आणि श्री चांगावटेश्वर महाराज यांची सासवड येथून या चार संताच्या पादुका मंगळवार (दि.30) रोजी पुणे जिल्ह्यातून एसटीतून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहेत. या प्रत्येक पालखी सोहळ्यात केवळ केवळ 20 व्यक्तींना सहभागी होण्यास परवानगी देण्यात आली आहे. यामुळे वरील चार पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या सर्व 80 व्यक्तींची कोरोना चाचणी करणे बंधनकारक करण्यात आले. त्यानुसार जिल्हा प्रशासनाच्या वतीने कोरोना चाचणी करण्यात आली. यात 4 व्यक्तींची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह असल्याचे स्षष्ट झाले. यामुळे प्रशासनाने तातडीने संबंधित विश्वस्तांना कळविण्यात आले. जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या खबरदारीमुळे मात्र मोठा अनर्थ टळला आहे.

टॅग्स :PuneपुणेAshadhi Ekadashiआषाढी एकादशीPandharpur Wariपंढरपूर वारीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसsant tukaram palkhiसंत तुकाराम पालखीsant dnyaneshwar palkhiसंत ज्ञानेश्वर पालखी