शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

आशा सेविकांचे मानधन हजार रुपयांनी वाढविले; राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2021 11:49 IST

गटप्रवर्तकांच्या मानधनात १२०० रुपयांनी वाढ, ५०० रुपये कोरोना भत्ता; अन्न प्रक्रिया उद्योगांना अधिक प्रोत्साहन देणार कृषीवर आधारीत अन्न प्रक्रिया उद्योगांना सामूहिक प्रोत्साहन योजना २०१९ अंतर्गत सुधारित प्रोत्साहने देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला. गुंतवणुकीच्या कालावधीसाठी निश्चित करण्यात आलेल्या तरतुदीतून  या उद्योगांना सूट देण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यभरातील ६५ हजार आशा स्वयंसेविकांच्या मानधनात दरमहा एक हजार रुपये तर गट प्रवर्तकांच्या मानधनात दरमहा बाराशे रुपयांची वाढ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत गुरुवारी घेण्यात आला. नवीन शैक्षणिक संस्थाच्या परवानगीसाठी मुदतवाढ तंत्रशिक्षणाच्या नवीन शैक्षणिक संस्थांच्या परवानगीसाठी आता १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येतील. जादा विद्याशाखा, नवीन विषय आणि ज्यादा तुकड्या सुरु करण्यासंबंधीचे हे अर्ज आहेत. शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये संस्था बंद करू इच्छिणाऱ्या व्यवस्थापनांनादेखील १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येतील, असा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला.

अन्न प्रक्रिया उद्योगांना अधिक प्रोत्साहन देणार कृषीवर आधारीत अन्न प्रक्रिया उद्योगांना सामूहिक प्रोत्साहन योजना २०१९ अंतर्गत सुधारित प्रोत्साहने देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला. गुंतवणुकीच्या कालावधीसाठी निश्चित करण्यात आलेल्या तरतुदीतून  या उद्योगांना सूट देण्यात आली आहे.

फॅमिली कोर्ट न्यायाधीशांना सुधारित वेतनश्रेणीकुटुंब न्यायालयातील न्यायाधीशांना सुधारित वेतनश्रेणी लागू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला. शेट्टी आयोगाच्या शिफारशीनुसार १ जुलै १९९६ पासून  व न्या. पद्मनाभन समितीच्या शिफारशीनुसार कुटुंब न्यायालयातील सरळसेवेने नियुक्त झालेल्या न्यायाधीशांना, जिल्हा न्यायाधीश (प्रथम प्रवेश) तसेच सरळसेवेने नियुक्त झालेल्या जिल्हा न्यायाधीश निवड श्रेणी व जिल्हा न्यायाधीश (उच्च समयश्रेणी) या वेतन श्रेणी लागू करण्यास मंजुरी देण्यात आली.

जुलै २०२१ पासून वाढआशा सेविकांना आतापर्यंत दरमहा ४ हजार रुपये मानधन मिळत होते. आता त्यांना ५ हजार रुपये मिळतील. ४ हजार गट प्रवर्तकांना आतापर्यंत दरमहा ८ हजार रुपये मानधन मिळत होते. आता ९ हजार २०० रुपये मिळतील. आशा सेविका आणि गट प्रवर्तक अशा दोघांनाही दरमहा ५०० रुपये कोरोना भत्ता देण्याचा निर्णयदेखील मंत्रिमंडळाने घेतला. ही वाढ जुलै २०२१ पासून देण्यात येणार आहे.

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार