आशा भोसले यांना स्वामीरत्न पुरस्कार

By Appasaheb.patil | Updated: July 4, 2019 13:28 IST2019-07-04T13:28:03+5:302019-07-04T13:28:08+5:30

अक्कलकोट स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ : स्वप्निल जोशी, ना. धों. महानोर राज्य पुरस्काराचे मानकरी

Asha Bhosale received the Swamyratna Award | आशा भोसले यांना स्वामीरत्न पुरस्कार

आशा भोसले यांना स्वामीरत्न पुरस्कार

सोलापूर : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ (ट्रस्ट) अक्कलकोट यांचा ३२ वा वर्धापन दिन आणि गुरुपौर्णिमा उत्सवाचे औचित्य साधून १५ जुलै रोजी आयोजित करण्यात आलेल्या प्रथमवर्षीय पुरस्कार वितरण समारंभात ख्यातनाम गायिका पद्मविभूषण आशा                  भोसले यांना स्वामीरत्न राष्ट्रीय पुरस्कार, सिनेअभिनेता स्वप्नील जोशी व ज्येष्ठ कवी, गीतकार ना. धों. महानोर यांना स्वामीभूषण राज्य पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

या पुरस्काराचे वितरण पद्मश्री पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे़ यावेळी प्रिसिजन उद्योग समूहाचे यतीन शहा, अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजय भोसले आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधीर गाडगीळ हे करणार आहेत.

या पत्रकार परिषदेस राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कार निवड समिती अध्यक्ष पंडित हृदयनाथ मंगेशकर,  श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ (ट्रस्ट)चे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले, प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले,  उपाध्यक्ष अभय खोबरे, खजिनदार लाला राठोड, निवेदक सुधीर  गाडगीळ, संयोजक अनुषा श्रीनिवासन अय्यर, प्रशांत भगरे आणि इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

Web Title: Asha Bhosale received the Swamyratna Award