शहरं
Join us  
Trending Stories
1
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
2
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार
3
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
6
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
7
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
8
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
9
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
10
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
11
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
12
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
13
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
14
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
15
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
16
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!

क्रूझवरील ड्रग्ज कारवाईचं गुजरात अन् भाजप कनेक्शन; राष्ट्रवादीच्या मलिकांनी सांगितला घटनाक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2021 4:09 PM

एनसीबीच्या कारवाईवर राष्ट्रवादीला संशय; फोटो आणि व्हिडीओ दाखवत खळबळजनक दावे

मुंबई: क्रूझवरील ड्रग्ज पार्टीवर एनसीबीनं केलेल्या कारवाईवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं शंका उपस्थित केली आहे. एनसीबीच्या कारवाईचं भाजपशी कनेक्शन असल्याचा खळबळजनक दावा राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केला. आर्यन खानसोबत क्रूझवरून अटक करण्यात आलेल्या अरबाज मर्चंटला नेणारा व्यक्ती एनसीबीचा अधिकारी नव्हता. तर तो भाजपचा पदाधिकारी आहे, असा गौप्यस्फोट मलिक यांनी केला. त्यांनी या व्यक्तीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सोबतचे फोटोदेखील दाखवले.

भाजपचा पदाधिकारी एनसीबीच्या कारवाईवेळी काय करत होता?आर्यन खानसोबतच अरबाज मर्चंटलादेखील क्रूझवरून अटक करण्यात आली. त्याला एक जण पकडून एनसीबीच्या कार्यालयात नेत होता. ही व्यक्तीदेखील एनसीबीशी संबंधित नाही. तो भाजपचा उपाध्यक्ष मनीष भानुशाली आहे. त्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप आमदार आशिष शेलार यांच्यासोबत फोटो आहेत, असा दावा मलिक यांनी केला. त्यांनी भानुशालीचे फोटोदेखील पत्रकार परिषदेत दाखवले. भानुशालीच्या फेसबुक अकाऊंटवर भाजप नेत्यांसोबतचे फोटो आहेत. आता हे अकाऊंट लॉक करण्यात आल्याचं मलिक यांनी सांगितलं.

भानुशाली गेले १५ दिवस काय करत होता?मनीष भानुशाली २१ सप्टेंबरला दिल्लीला गेला होता. तिथे त्यानं केंद्रीय मंत्र्यांच्या गाठीभेटी घेतल्या, अशी माहिती मलिक यांनी दिली. '२२ सप्टेंबर ते २८ सप्टेंबर या कालावधीत भानुशाली गुजरातमध्ये होता. तिथे त्यानं मंत्रालयात काही बैठका घेतल्या. २२ सप्टेंबर तारीख अतिशय महत्त्वाची आहे. कारण याच दिवशी अदानी समूहाशी ताब्यात असलेल्या गुजरातमधल्या मुंद्रा बंदरावर ३ हजार किलो अंमली पदार्थ सापडले. त्या दिवशी भानुशाली गुजरातमध्येच होता,' असा घटनाक्रम मलिक यांनी सांगितला. २८ सप्टेंबरला भानुशाली मुंबईत आला. मग १ ऑक्टोबरला पुन्हा गुजरातला गेला. तिथे त्यानं राज्य सरकारमधल्या एका मंत्र्यांची भेट घेतली. त्यानंतर तिथून तो मुंबईत परतला आणि क्रूझवर एनसीबीनं केलेल्या कारवाईवेळी तो उपस्थित होता, असं मलिक म्हणाले.

मनीष भानुशाली नेमका कोण?मनीष भानुशाली मूळचा डोंबिवलीचा रहिवासी आहे. पेशानं व्यवसायिक असलेला भानुशाली २०१२ पर्यंत भाजपचा पदाधिकारी होता. त्यानंतरही तो पक्षात सक्रिय होता. त्याच्या फेसबुक अकाऊंटवर त्याचे भाजपच्या अतिशय मोठ्या नेत्यांसोबतचे फोटो आहेत. पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, नारायण राणेंसोबत भानुशालींचे फोटो आहेत.

टॅग्स :nawab malikनवाब मलिकAryan Khanआर्यन खानBJPभाजपाNCBनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो