जिजाऊंच्या जयंती दिनी महाराष्ट्रातील जनतेशी साधणार संवाद, अरविंद केजरीवालांचं मराठीतून ट्विट
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2018 11:21 IST2018-01-09T09:11:18+5:302018-01-09T11:21:20+5:30
नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी (9 जानेवारी )मराठीतून ट्विट करत महाराष्ट्रातील जनतेला साद घातली आहे.

जिजाऊंच्या जयंती दिनी महाराष्ट्रातील जनतेशी साधणार संवाद, अरविंद केजरीवालांचं मराठीतून ट्विट
नवी दिल्ली - नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी (9 जानेवारी )मराठीतून ट्विट करत महाराष्ट्रातील जनतेला साद घातली आहे. 12 जानेवारीला केजरीवाल महाराष्ट्राच्या दौ-यावर असणार आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी मराठीतून ट्विट करत आपल्या कार्यक्रमाबाबतची माहिती दिली आहे. 'नमस्कार,राजमाता जिजाऊ जयंती दिनी १२ जानेवारीला महाराष्ट्रातील तमाम जनतेशी संवाद साधायला मी सिंदखेड राजा येथे येत आहे.', असे ट्विट केजरीवाल यांनी केले आहे.
केजरीवाल हे येथे सभा घेणार असल्याची माहिती आहे. सुरूवातीला पोलिसांनी केजरीवाल यांच्या सभेला परवानगी नाकारली होती. आता पोलिसांनी या सभेला परवानगी दिल्याची माहिती समोर आली आहे. याच पार्श्वभूमीवर केजरीवाल यांनी मराठीतून ट्विट करत महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधणार असल्याचे म्हटले आहे.
नमस्कार,
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) January 9, 2018
राजमाता जिजाऊ जयंती दिनी १२ जानेवारीला महाराष्ट्रातील तमाम जनतेशी संवाद साधायला मी सिंदखेड राजा येथे येत आहे.