परमबीर सिंगना अटक करा आणि अनिल देशमुखांचा राजीनामा घ्या; भाजप आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2021 07:48 PM2021-03-20T19:48:00+5:302021-03-20T19:49:57+5:30

parambir singh: अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना दर महिन्याला १०० कोटी रूपये गोळा करण्यास सांगितले होते असा मोठा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला आहे.

arrest parambir singh and anil deshmukh should resign demands bjp leader atul bhatkhalkar | परमबीर सिंगना अटक करा आणि अनिल देशमुखांचा राजीनामा घ्या; भाजप आक्रमक

परमबीर सिंगना अटक करा आणि अनिल देशमुखांचा राजीनामा घ्या; भाजप आक्रमक

googlenewsNext
ठळक मुद्देपरमबीर सिंगांना अटक करा आणि अनिल देशमुख यांचा राजीनामा घ्यापरमबीर सिंगांच्या पत्रानंतर भाजप पुन्हा आक्रमकराज्यातील सरकार खंडणीखोरांचे - भाजपचा गंभीर आरोप

मुंबई : मुंबई पोलीस आयुक्तपदावरून उचलबांगडी करण्यात आलेले परमबीर सिंग (parambir singh) नाराज असून, पदभार न घेताच ते रजेवर गेले आहेत. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (anil deshmukh) यांच्यावर मोठा आरोप केला आहे. अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना दर महिन्याला १०० कोटी रूपये गोळा करण्यास सांगितले होते असा मोठा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला आहे. यावरून भाजप (bjp) आता आक्रमक झाला असून, परमबीर सिंगना अटक करा आणि अनिल देशमुखांचा राजीनामा घ्या, अशी मागणी भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे. (arrest parambir singh and anil deshmukh should resign demands bjp leader atul bhatkhalkar)

परमबीर सिंगांनी आपल्या पत्रात सचिन वाझे यांना दर महिन्याला १०० कोटी रुपये गोळा करण्याचे आदेश दिले होते, हे सांगणं म्हणजे महाराष्ट्रातील मोठा राजकीय भूकंप आहे. सचिन वाझेंना आदेश देणाऱ्या अनिल देशमुख यांना हे कोणी सांगितलं, हेही आता परमबीर सिंग यांनी सांगावं. सचिन वाझे यांना सेवेत परत आणणाऱ्यांनी अशा प्रकारचे आदेश दिले का, अशी शंका अतुल भातखळकर यांनी उपस्थित केली. 

परमबीर सिंगाना अटक करावी

या प्रकरणात परमबीर सिंगांना अटक करा आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांचाही राजीनामा घ्यावा. त्यांची चौकशी करून त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी. राज्य सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या सर्व प्रश्नांना रात्री जनतेसमोर खुलासा करण्याची आवश्यकता आहे, अशी मागणी करत अन्यथा मुख्यमंत्री या सर्व प्रकारात सहभागी आहेत की काय, अशी शंका जनतेच्या मनात येईल, असा दावा भातखळकर यांनी यावेळी बोलताना केला.

अनिल देशमुखांनी सचिन वाझेंना दरमहा १०० कोटी गोळा करायला सांगितले होते; परमबीर सिंग यांचा खळबळजनक आरोप

राज्यातील सरकार खंडणीखोरांचे

गृहमंत्र्यांनी हप्ता गोळा करायचं टार्गेट दिलं होतं, असे परमबीर सिंग यांचे पत्र गंभीर आणि धक्कादायक आहे. हे राज्यातील सरकार खंडणीखोरांचे, गुन्हेगारांचे हे सिद्ध करण्याच विडाच उचलला आहे. अनिल देशमुख यांनी तातडीने बाजूला व्हायला हवे अथवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनिल देशमुखांना काढायला हवे, अशी मागणी भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे. 

दरम्यान, टाईम्स नाऊनं दिलेल्या वृत्तानुसार मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिलं आहे. यामध्ये त्यांनी अनिल देशमुख यांनी सचिना वाझे यांना दर महिन्याला बार, रेस्तराँ आणि अन्य आस्थापनांमधून १०० कोटी रूपये गोळा करण्यास सांगितले होते, असा धक्कादायक आरोप त्यांनी या पत्रातून केला आहे. 

Web Title: arrest parambir singh and anil deshmukh should resign demands bjp leader atul bhatkhalkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.