शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
4
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
5
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
6
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
7
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
8
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
9
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
10
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
11
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
12
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
13
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
14
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
15
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
16
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
17
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
18
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
19
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
20
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...

...हे अंडरवर्ल्डचे राज्य आहे का? चंद्रकांत पाटील यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2022 06:11 IST

नाना पटोलेंना अटक करण्याची मागणी

मुंबई : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणतात की, मोदींना मी मारू शकतो, शिव्या देऊ शकतो. राष्ट्रवादी काँग्रेसचे नवाब मलिक म्हणतात की, देवेंद्र फडणवीसांना शरद पवार काशीचा घाट दाखवतील! हे काय चालले आहे? राज्यात अंडरवर्ल्डचे राज्य आहे का, असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत केला. ‘...तर थोबाडीत मारली असती’, असे विधान केले म्हणून नारायण राणे यांना सरकारने अटक केली. आता पंतप्रधान मोदींना मारण्याची भाषा करणाऱ्या पटोलेंनाही अटक करा. पण प्रशासन दबावात असल्याने तसे करणार नाही. तक्रार घेऊन गेलेले आमचे आमदार अतुल भातखळकर यांच्यावरच कारवाई केली. आ. चंद्रशेखर बावनकुळे पोलीस ठाण्यात ठाण मांडून बसले, पण पटोलेंविरुद्ध कारवाई झाली नाही.  आम्ही न्यायालयात जाऊ, असे पाटील म्हणाले. नवाब मलिक यांनी काशीच्या घाटाबाबत विधान केले. उद्या फडणवीस यांच्या जिवाचे काही बरेवाईट झाले तर त्याची जबाबदारी मलिक यांची असेल, असेही ते म्हणाले. सहा दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह आमदार आंदोलनातनागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य करणारे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधात नागपुरात भाजपतर्फे आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रचंड गर्दी झाली. आश्चर्याची बाब म्हणजे, १३ जानेवारी रोजीच कोरोनाची लागण झालेले पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे हे विलगीकरण सोडून चक्क आंदोलनात उतरले. १३ जानेवारी रोजी खोपडे यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती व त्यांनीच सोशल माध्यमांवरून सर्वांना ती माहिती दिली होती. त्यानंतर ते गृहविलगीकरणात होते. मनपाचे आरोग्य अधिकारी संजय चिलकर यांच्याशी संपर्क साधला. कुठलीच लक्षणे नसतील तर बाहेर निघण्यास काहीच हरकत नसल्याचे सांगितल्याने मी आंदोलनात सहभागी झालो, अशी भूमिका खोपडे यांनी मांडली.  चिलकर म्हणाले, खोपडे यांना केवळ कोरोना प्रोटोकॉलची माहिती दिली.  खोपडे यांनी ते पॉझिटिव्ह असल्याची कुठलीही माहिती मला दिली नव्हती.    जरा गोव्यातील मते बघितली का? गोव्यात गेल्या निवडणुकीत शिवसेनेला एकूण ७९२ मते मिळाली होती. सर्व ठिकाणी डिपॉझिट गेले. उत्तर प्रदेशात ५७ पैकी ५६ जागी डिपॉझिट गेले. राष्ट्रवादीने गोव्यात १७ जागा लढविल्या. ३०,९१६ मते मिळाली. आता शिवसेनेचे संजय राऊत गोवा, उत्तर प्रदेशात भाजपचा पराभव करायला निघाले आहेत, अशी खिल्लीही पाटील यांनी उडविली. 

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलNana Patoleनाना पटोले