शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
2
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
3
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
4
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
5
विराटच्या खांद्याला खांदा लावून वर्ल्डकप जिंकला, आता IPL 2026 मध्ये करतोय पंचगिरी, कोण आहे 'हा' खेळाडू?
6
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
7
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
8
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
9
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
10
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
11
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
12
आलिशान गाडी अन् ५५ लाख, 'मॅडम कलेक्टर'चा पर्दाफाश; नोकरीच्या नावाखाली तरुणांना फसवलं
13
Watermelon Price: मुंबईतील 'त्या' घटनेनंतर कलिंगडाचे दर कोसळले, आता किती रुपयांना मिळतंय?
14
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
15
तब्बल ४० तास हृदयाची धडधड होती बंद, तरीही जिवंत राहिली ही व्यक्ती, चमत्कार की...
16
वहिनी अश्विनी देशमुख यांच्या पराभवानंतर धनंजय देशमुख स्पष्टच बोलले; म्हणाले, “संतोष अण्णा...”
17
Gold Silver Rate 29 April: सोन्या-चांदीच्या दरात बदल; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
18
नृसिंह जयंती २०२६: गुरुवारी आलाय खास योग; बाधा मुक्तीसाठी करा 'हळदीचा' हा प्रभावी उपाय!
19
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
20
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
Daily Top 2Weekly Top 5

प्राईम टाईमवरून सेना-राष्ट्रवादीने केली डेंची 'शोभा'

By admin | Updated: April 8, 2015 14:09 IST

प्राईम टाइममध्ये मराठी चित्रपट दाखवण्याच्या निर्णयाला विरोध दर्शवत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करणा-या प्रसिद्ध लेखिका शोभा डे यांच्याविरोधात शिवसेना व राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ८ - राज्यातील सर्व मल्टिप्लेक्समध्ये प्राईम टाइममध्ये मराठी चित्रपट दाखवण्याच्या निर्णयाला विरोध दर्शवत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करणा-या प्रसिद्ध लेखिका शोभा डे यांच्याविरोधात शिवसेना व राष्ट्रवादी आक्रमक झाली असून डे यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.  मराठी जनतेच्या भावना दुखावणारे वक्तव्य केल्याप्रकरणी डे यांनी सर्व जनतेची माफी मागावी अशी मागणी प्रताप सरनाईक यांनी केली आहे. 
देवेंद्र फडणवीस यांचे सरकार हुकूमशहा असल्याची टीका डे यांनी ट्विटरवरून केली होती. तसेच आता मल्टिप्लेक्समध्ये पॉपकॉर्नऐवजी दही मिसळ आणि वडापाव खावा लागेल, असा उपरोधिक प्रश्नही त्यांनी विचारला होता. मराठी चित्रपटांवर माझं प्रेम आहे, तो कधी आणि कुठे पहायचा हे माझं मला ठरवू दे. हा निर्णय म्हणजे फक्त दादागिरी आहे, असेही त्यांनी ट्विटरवर म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून आता नवा वाद निर्माण झाला असून जितेंद्र आव्हाड यांनीही डे यांच्यावर टीका केली आहे. 
मराठी चित्रपटांना नवसंजीवनी देण्यासाठी राज्यातील सर्व मल्टिप्लेक्समध्ये प्राइम टाइममध्ये मराठी चित्रपट दाखविण्याची सक्ती केली जाईल, अशी घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी मंगळवारी विधानसभेत केली.