शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

"अरेरावीची भाषा व्यक्तिगत दुश्मनी असल्यावर बोलली जाते’’, अजित पवार गटाचा उद्धव ठाकरेंना टोला  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2024 19:50 IST

NCP Ajit Pawar Criticize Uddhav Thackeray: शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज भाजपा नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यावर आता

मुंबई  - शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज भाजपा नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली होती. तसेच यापुढे राज्याच्या राजकारणात एकतर तुम्ही तरी राहाल, नाहीतर मी तरी राहीन अशा निर्वाणीच्या भाषेत आव्हान दिले होते. दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या या विधानावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने जोरदार टीका केली आहे. ‘’अरेरावीची भाषा व्यक्तिगत दुश्मनी असते त्यावेळी बोलली जाते’ असा टोला अजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी लगावला आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना उमेश पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, अरेरावीची भाषा व्यक्तिगत दुश्मनी असते त्यावेळी बोलली जाते. उद्धव ठाकरे यांनी ऐनवेळी देवेंद्र फडणवीस यांना दगा दिला आणि युती तोडून महाविकास आघाडीत गेले. राजकारणात ऐनवेळी फसवल्यानंतर परिणाम भोगावे लागतात. त्यामुळेच तुम्हाला मुख्यमंत्रिपद सोडावं लागलं, आपला पक्ष फुटला त्याचा राग व्यक्तिगत पातळीवर देवेंद्र फडणवीस यांच्यावर काढताय हे योग्य नाही असेही उमेश पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना सुनावले आहे.

उमेश पाटील पुढे म्हणाले की, लोकांसाठी वेळ देतो, परिश्रम घेतो, तोच राजकारणात टिकतो. अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तिघेही सकाळपासून रात्रीपर्यंत लोकांच्या गराड्यात असतात. तुम्ही मात्र घरात बसता. तुमच्या आमदारांना भेटण्यासाठी वेळ मागावी लागते. तुम्ही आमदार खासदारांना सहा सहा महिने भेटत नाही, असा टोला  उमेश पाटील यांनी यावेळी लगावला.  

शिवसेना का फुटली, त्याची कारणे काय आहेत. तुम्ही कोरोना काळात घरात बसून फेसबुक लाईव्ह करत होतात. आमदारांना भेटायचे असते. आमदार हे तीन तीन लाख लोकांमधून निवडून येतात. बैठका घ्याव्या लागतात. त्यांना वेळ द्यावा लागतो. मात्र वेळ दिला नसल्याने महाराष्ट्राच्या राजकारणापासून तुम्ही दूर फेकले गेलात. राजकारणात टिकून राहण्यासाठी सातत्याने लोकांची कामे करावी लागतात. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजेत असेही उमेश पाटील म्हणाले.

तुमची भूमिका महाराष्ट्राच्या भल्यासाठी असली पाहिजे. शिवसेना संघटना एकट्या  देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात व्यक्तिकेंद्रीत असेल तर महाराष्ट्रातील जनतेला उद्धव ठाकरे तुमच्याबद्दल विचार करावा लागेल, असेही उमेश पाटील यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरेMahavikas Aghadiमहाविकास आघाडीMahayutiमहायुतीAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस