शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

ते माझे मित्र की शत्रू?; राधाकृष्ण विखे पाटलांच्या ऑफरवर अशोक चव्हाण स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2023 14:47 IST

मित्रत्व वेगळे आणि पक्षीय विचारसरणी यात फरक आहे. महाराष्ट्रातील अनेक पक्षातील विविध नेत्यांसोबत माझे चांगले संबंध आहेत असं अशोक चव्हाण म्हणाले.

मुंबई - गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले आहेत. नाशिक पदवीधर निवडणुकीत सत्यजित तांबे यांनी पक्षीय राजकारणावर भाष्य केले होते. तिथेच बाळासाहेब थोरात यांनीही पक्षांतर्गत वादातून तांबे यांनी अपक्ष निवडणूक लढवली असं म्हटलं होते. त्यामुळे काँग्रेसमधील पटोले-थोरात वाद समोर आला होता. त्यातच या वादाचा फायदा घेत भाजपा नेते आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अशोक चव्हाण यांना भाजपात येण्याची ऑफर दिली. त्याला अशोक चव्हाणांनीही प्रत्युत्तर दिले आहे. 

अशोक चव्हाण म्हणाले की, मित्रत्व वेगळे आणि पक्षीय विचारसरणी यात फरक आहे. महाराष्ट्रातील अनेक पक्षातील विविध नेत्यांसोबत माझे चांगले संबंध आहेत. पण संबंध आहेत म्हणून त्यांच्या पक्षाच्या विचारसरणीशी माझे समान मत असेल असं मानायचं कारण नाही. विखे पाटलांच्या सदिच्छेबद्दल आभार परंतु मी कुठलाही विचार किंवा निर्णय घेतला नाही. याआधीही मी अनेकदा यावर भाष्य केले आहे असं त्यांनी सांगितले. 

त्याचसोबत ते माझे मित्र आहेत की शत्रू आहेत हाच खरा प्रश्न निर्माण होतो. काँग्रेस पक्षात काही गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न आहे का याची शंका येते. मी त्यांना शुभेच्छा देतो मात्र राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलेला सल्ला मला अमान्य आहे असं स्पष्ट शब्दात सांगत अशोक चव्हाणांनी भाजपात येण्याची ऑफर नाकारली आहे. 

काय म्हणाले होते राधाकृष्ण विखे पाटील? माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचं काँग्रेस पक्षात काहीच भवितव्य नाही. त्यांचे भवितव्य अंधारमय आहे. त्यामुळे त्यांनी भाजपात प्रवेश करावा. लवकरच काँग्रेसचा कडेलोट होणार आहे. अशोक चव्हाण यांसारखा अनुभवी आणि ज्येष्ठ नेत्यांचे काँग्रेसमध्ये भविष्य नाही. नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व देशानेच नाही तर जगानेही मान्य केले आहे. त्यामुळे अशोक चव्हाण यांनी मोदी यांच्या नेतृत्वात काम करायला हवं असं विधान करत राधाकृष्ण विखे पाटलांनी अशोक चव्हाणांना थेट भाजपात येण्याची ऑफर दिली होती.  

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेसAshok Chavanअशोक चव्हाणRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटील