शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
13
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
14
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
15
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
16
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
17
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
18
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
19
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
20
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?

पंतप्रधानांकडून शिल्पकार सुतार यांचा अवमान नाही : अनिल सुतार यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2018 11:52 AM

कोल्हापूर : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जगातील सर्वांत मोठ्या पुतळ्याचे शिल्पकार राम सुतार यांचा पुतळ्याच्या उद्घाटन समारंभप्रसंगी पंतप्रधानांकडून अवमान ...

ठळक मुद्देपंतप्रधानांकडून शिल्पकार सुतार यांचा अवमान नाही समारंभात पंतप्रधानांच्या हस्ते त्यांचा सत्कार : अनिल सुतार यांची माहिती

कोल्हापूर : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जगातील सर्वांत मोठ्या पुतळ्याचे शिल्पकार राम सुतार यांचा पुतळ्याच्या उद्घाटन समारंभप्रसंगी पंतप्रधानांकडून अवमान झालेला व्हिडीओ व्हायरल झाला आहे. मात्र त्या व्हिडीओतील जॅकेट घातलेली व्यक्ती हे राम सुतार नाहीत.शिवाय सूतार यांचा कोणताही अवमान नव्हेच तर या समारंभात पंतप्रधानांच्या हस्ते त्यांचा सत्कार झाला असल्याची माहिती त्यांचा मुलगा अनिल सुतार यांनी ‘लोकमत’ला दिली.ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांच्या संकल्पनेतून नर्मदेच्या सरदार सरोवर येथे सरदार वल्लभभाई पटेल यांचा ‘स्टॅच्यू आॅफ युनिटी’ हा जगातील सर्वांत मोठा पुतळा साकारला आहे. या पुतळ्याचे ३१ आॅक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या उद्घाटनाच्या कार्यक्रमाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून, त्यात जॅकेट घातलेली एक वयस्कर व्यक्ती पंतप्रधानांच्या शेजारी येऊन उभारते आणि पंतप्रधान मोदी त्यांची दखलही न घेता तेथून निघून गेल्याचे दिसते. जॅकेट घातलेले ती व्यक्ती म्हणजे शिल्पकार राम सुतार असून, पंतप्रधानांनी त्यांचा अवमान केला, असा संदेश या व्हिडीओसोबत पाठविला जात आहे.याबाबतचे सत्य जाणून घेण्यासाठी ‘लोकमत’ ने राम सुतार यांचा मुलगा अनिल यांच्याशी संपर्क साधला. ते म्हणाले, ‘व्हिडिओतील ते वयस्कर व्यक्ती माझे वडील नाहीत. मी आणि वडील असे आम्ही दोघेही समारंभाच्या मुख्य मंडपामध्ये बसलो होतो. कार्यक्रमादरम्यान वडिलांचा शाल देऊन सत्कारही करण्यात आला. त्यामुळे या कार्यक्रमात वडिलांचा अवमान होण्यासारखी कोणतीही गोष्ट घडलेली नाही.’ 

टॅग्स :Statue Of Unityस्टॅच्यू ऑफ युनिटीNarendra Modiनरेंद्र मोदीkolhapurकोल्हापूर