शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील ५०१२ सहायक प्राध्यापक पद भरतीस मान्यता; पाहा अटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 19:05 IST

State Govt Job Recruitment News: राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्राला बळकटी देण्यासाठी आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.

State Govt Job Recruitment News: राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्राला बळकटी देण्यासाठी आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP 2020) ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांशी संलग्न असलेल्या मान्यताप्राप्त अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमधील सहायक प्राध्यापक संवर्गातील ५ हजार १२ रिक्त पदे भरण्यास शासनाने मान्यता दिली आहे.अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

मंत्री चंद्रकांत दादा पाटील म्हणाले, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी सुरू असून, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी आणि विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (UGC) निर्देशानुसार प्राध्यापकांची रिक्त पदे भरणे अनिवार्य होते. याच पार्श्वभूमीवर हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

भरती प्रक्रियेच्या प्रमुख अटी व शर्ती

विद्यार्थी संख्येवर आधारित पदे दि.१ ऑक्टोबर २०२५ रोजीच्या विद्यार्थी संख्येनुसार निश्चित झालेल्या कार्यभाराच्या आधारे ही ५,०१२ पदे भरली जातील. ही भरती प्रक्रिया विहित कालमर्यादेत आणि पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने राबवण्याची जबाबदारी उच्च शिक्षण संचालक (पुणे) आणि विभागीय सहसंचालकांची असेल.

NAAC मानांकन अनिवार्य

ज्या शैक्षणिक संस्थांकडे 'नॅक' (NAAC) मान्यता आहे, त्यांनाच नवीन पदनिर्मितीचा लाभ मिळेल. मात्र, ज्यांचे मूल्यांकन कमी आहे, त्यांना सुधारणेसाठी ३ वर्षांचा सवलतीचा कालावधी (Grace Period) देण्याबाबत शासन स्वतंत्र धोरण आखणार आहे.

आचारसंहितेचे पालन

भरती प्रक्रियेदरम्यान राज्यात आचारसंहिता लागू असल्यास, निवडणूक आयोगाच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.सूचनांचे काटेकोर पालन करण्याची जबाबदारी संचालक,उच्च शिक्षण पुणे व संबंधित विभागीय सहसंचालक यांची राहील. नवीन शैक्षणिक धोरणानुसार पदांचा सुधारित आराखडा (आकृतीबंध) निश्चित करण्यासाठी उच्च शिक्षण संचालकांच्या स्तरावर एक समिती नियुक्त केली जाणार आहे. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर (www.maharashtra.gov.in) उपलब्ध आहे.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra Approves 5012 Assistant Professor Posts in Aided Colleges

Web Summary : Maharashtra government approves filling 5012 assistant professor posts in aided colleges to strengthen higher education and implement NEP 2020. NAAC accreditation is essential. Recruitment transparency is key, following UGC guidelines and election codes.
टॅग्स :State Governmentराज्य सरकारCareer Guidanceकरिअर मार्गदर्शनjobनोकरीMahayutiमहायुतीchandrakant patilचंद्रकांत पाटील