२६ जानेवारीपूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे, निधी वितरित करण्याच्या प्रस्तावास मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 06:30 IST2025-01-17T06:30:00+5:302025-01-17T06:30:02+5:30

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जातात.

Approval for proposal to distribute money, funds to the accounts of beloved sisters before January 26 | २६ जानेवारीपूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे, निधी वितरित करण्याच्या प्रस्तावास मंजुरी

२६ जानेवारीपूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे, निधी वितरित करण्याच्या प्रस्तावास मंजुरी

मुंबई : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना जानेवारी महिन्याचा हप्ता येत्या २६ जानेवारीपूर्वी दिला जाणार असून या योजनेच्या जानेवारी महिन्याचा हप्ता देण्यासाठी ३६९० कोटी रुपयांचा निधी वितरित करण्याच्या प्रस्तावास मंत्रिमंडळाने गुरुवारी मान्यता दिली.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जातात. लाडकी बहीण योजनेत महिलांना डिसेंबर महिन्याचा हप्ता देण्यात आला आहे. त्यानंतर जानेवारी महिन्याचा हप्ता अद्याप या लाभार्थींना मिळाला नसून हा हप्ता कधी मिळणार याकडे महिलांचे लक्ष आहे.

सहा महिन्यांपूर्वी, जुलैमध्ये राज्य सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पात महायुती सरकारने ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची’ घोषणा केली. या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या २१ ते ६५ या वयोगटातील २ कोटी ४६ लाख महिलांना आतापर्यंत दरमहा १५०० रुपये देण्यात येतात. डिसेंबर महिन्याचे पैसेही २ कोटींहून अधिक पात्र महिलांच्या खात्यात जमा झाले . 

या योजनेसाठी पुरेसा निधी शासनाकडे असून त्यातूनच लाभार्थ्यांना पैसे दिले जात असल्याचे महिला व बालकल्याण विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले.  या योजनेसाठी जानेवारी महिन्यासाठी आवश्यक २६९० कोटी रुपयांच्या निधीला मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली, असे या विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले.

Web Title: Approval for proposal to distribute money, funds to the accounts of beloved sisters before January 26

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.